Join us  

​Exclusive फास्टर फेणेमध्ये सिद्धार्थ जाधव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2016 5:21 PM

       priyanka londheरितेश देशमुखच्या फास्टर फेणे या चित्रपटाची काही दिवसांपासून चांगलीच चर्चा रंगली आहे.  या मराठी ...

       priyanka londheरितेश देशमुखच्या फास्टर फेणे या चित्रपटाची काही दिवसांपासून चांगलीच चर्चा रंगली आहे.  या मराठी चित्रपटाची निर्मिती रितेशने केली असून, यामध्ये आपल्याला अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत. फास्टर फेणेच्या अंदाजात अभिनेता अमेय वाघ धमाल उडवून देणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री पर्ण पेठे देखील असणार आहे. परंतु आता या चित्रपटामध्ये आपल्याला सर्वांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव देखील दिसणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थची एकदमच वेगळी भूमिका असल्याचे समजतेय. प्रेक्षकांसमोर या चित्रपटातून तो एकदमच हटके अंदाजात येणार असल्याचे समजतेय. चित्रपटाचे काही शूटिंग सिद्धार्थने पूर्ण केले आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यामध्ये सुरू आहे.  जवळपास ६० टक्के चित्रीकरण पूर्ण झाल्याचे समजतेय. अहो, एवढेच नाही तर ज्येष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर देखील या चित्रपटामध्ये इंटरेस्टींग भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटासंदर्भात लेखक क्षितिज पटवर्धनने लोकमत सीएनएक्सशी संवाद साधला. क्षितिज सांगतो, या चित्रपटाच्या निमित्ताने आमच्या सर्वांची एक छान टीम जमली आहे. सेटवर अतिशय धमाल वातावरण असते. दिलीप काका तर आमच्या संपूर्ण टीममध्ये एकदमच तरुण आहेत असे मी सांगेन. कारण सेटवर त्यांचा उत्साह अफलातून असतो. त्यांचे कॉमिक टायमिंग देखील फारच चांगले आहे. मी त्यांच्यासारखा विनोदी कलाकार खरंच पाहिला नाही. या चित्रपटात प्रेक्षकांना ते एका लव्हेबल भूमिकेत पाहायला मिळतील. अशा प्रकारची भूमिका ते पहिल्यांदाच साकारित आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच त्यांचे या चित्रपटातील कॅरेक्टर आवडेल याची मला खात्री वाटते. रितेश आणि जेनेलिया या चित्रपटाचे निर्माते जरी असले तरी त्यांनी आमच्या सर्वांना एक टीम म्हणून फारच चांगली वागणूक दिली आहे. मुंबईमध्ये शूटिंग सुरू असताना ते दोन तीन दिवस सेटवर येऊन गेले. तसेच कोणाला काय हवे नको या गोष्टींची देखील त्यांनी काळजीपूर्वक चौकशी केली. आता फास्टर फेणेमध्ये प्रेक्षकांना बरेच कलाकार पाहायला मिळणार हे मात्र नक्की.