Join us  

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसतेय श्रुती मराठे, साऊथमध्ये आहे तिला प्रचंड फॅन फॉलोईंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 11:49 AM

तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. श्रुतीच्या अभिनया इतकीच तिच्या सौंंदर्याची चर्चा असते. तिने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. श्रुती इन्स्टाग्रामवर आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.

अलीकडेच तिने तिचे पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. सिंपल लूकमध्ये ही  श्रुती तितकीच सुंदर दिसते. तिच्या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून चाहत्यांनी आपली पसंती दर्शवली.

श्रुतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती 'श्रुती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंतीची पावती दिली आहे. श्रुतीचा पती गौरव घाटणेकर सुद्धा अभिनेता आहे. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. गौरव घाटणेकर मराठी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेले नाव आहे. छोट्या पडद्यावरील ‘तुज विन सख्या रे’ या मालिकेतून गौरव घराघरांत पोहोचला होता.

टॅग्स :श्रुती मराठे