Join us  

Shreya Bugde : मी तुला अनफॉलो करेन..., श्रेया बुगडेच्या फोटोंवर स्वप्निल जोशीची कमेंट, काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 2:15 PM

Shreya Bugde, Swapnil Joshi : स्वप्निल जोशीला आवडली नाही श्रेया बुगडेची ही गोष्ट, काय आहे भानगड?

‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde ) सध्या कुठे आहे तर गोव्यात. होय, श्रेया सध्या गोव्याच्या ट्रिपवर आहे. आता गोव्याची ट्रिप आणि श्रेया या ट्रिपचे फोटो शेअर करणार नाही, असं कसं शक्य आहे?  श्रेयाने या ट्रिपचे एक ना अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

गोव्यातील निसर्ग सौंदर्याचे, तिथल्या समुद्र किना-यावरच्या भटकंतीचे अनेक फोटो तिने शेअर केले आहेत. इतकंच नाही, गोव्याच्या खमंग खाद्य पदार्थांचे फोटोही तिने न विसरता शेअर केले आहेत. गोव्यातील अस्सल मासांहारी मेजवानीचे हे फोटो पाहून कुणाच्याही तोंडाला पाणी सुटले. साहजिकच तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. पण अभिनेता स्वप्निल जोशी (Swapnil Joshi ) याने मात्र श्रेयाने शेअर केलेले फ्रिश फ्राय, फिश करी, भात, सोलकढीचे फोटो पाहून तिला अनफॉलो करण्याचं म्हटलं आहे.

होय, श्रेयाच्या फोटोंवर स्वप्निल जोशीनं केलेली कमेंट सध्या चर्चेत आहे. ‘तू गोव्यात असेपर्यंत मी तुला अनफॉलो करतोय. जेवणाचे हे फोटो मी आता अजून पाहू शकत नाही,’ अशी कमेंट स्वप्निलने केली आहे. विशेष म्हणजे, स्वप्निलच्या या कमेंटनंतर त्याला आणखी डिवचण्यासाठी श्रेयाने आणखी एका तोंडाला पाणी सुटेल अशा जेवणाच्या थाळीचा फोटो शेअर केला आहे. ‘नका ना असे करू,’ असा रिप्लाय तिने दिला आहे. एकंदर काय तर श्रेया तिकडे गोव्यात खमंग, लज्जतदार पदार्थांवर ताव मारतेय अन् इकडे स्वप्निलच्या तोंडाला पाणी सुटतंय. 

टॅग्स :श्रेया बुगडेस्वप्निल जोशी