Join us

प्रमिती नरके करणार लघुपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2016 11:16 IST

नाटकांप्रमाणेच कलाकारांमध्ये लघुपटाची क्रेझदेखील पाहायला मिळत आहे. कारण देवदत्त नागे, दिप्ती देवी यांच्यापाठोपाठ आता अभिनेत्री प्रमिती नरकेदेखील लघुपट करणार ...

नाटकांप्रमाणेच कलाकारांमध्ये लघुपटाची क्रेझदेखील पाहायला मिळत आहे. कारण देवदत्त नागे, दिप्ती देवी यांच्यापाठोपाठ आता अभिनेत्री प्रमिती नरकेदेखील लघुपट करणार असल्याचे समजत आहे. कारण छोटया पडदयावरील कलाकारांना चित्रपटापेक्षा लघुपट करणे जास्त शक्य होत आहे. कारण मालिकेचे रोजचे चित्रिकरणामधून थोडासा वेळ काढून लघुपटासाठी देणे शक्य असते. त्या तुलनेत मालिकांसोबत चित्रपट करणे अशक्य असते. असेच काहीसे अभिनेत्री प्रमिती नरके हिच्याबाबतीत घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रमिती ही तू माझा सांगती या मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेत ती आवलीचे पात्र साकारत आहे. या मालिकेत ती अभिनेता चिन्मय मांडलेकरसोबत पाहायला मिळत आहे. संत तुकाराम यांच्या जीवनावर आधारित ही मालिका आहे.  प्रमितीने यापूर्वीदेखील दोह नावाचा लघुपट केला आहे. त्याचबरोबर तिने रिंगण हे नाटकदेखील केले आहे. तिच्या या लघुपटाचे चित्रिकरण जानेवारीमध्ये होणार असल्याचे समजत आहे. मात्र तिचा हा लघुपट कोणत्या विषयावर भाष्य करणारा असेल हे अजून गुलदस्त्यात आहे. तसेच मालिका करत असल्यामुळे तिला इतर गोष्टीमध्ये वेळ देता येत नसल्याचेदेखील समजत आहे. मात्र लघुपटाचे चित्रिकरण हे कमी वेळात होत असल्याने तिला लघुपट करण्यास मिळत असल्याचे समजत आहे. त्यामुळे तिने ही लघुपट करण्याची संधी सोडली नाही.  तू माझा सांगती या मालिकेचे शेडयुल्डमध्ये सध्या खूपच व्यग्र झाली आहे. आता नाटक, मालिका आणि लघुपटानंतर प्रमिती चित्रपटात पाहायला मिळते का या उत्साहात तिचे चाहतेदेखील आहे. मध्यंतरी प्रमितीचे फोटोशुट हे खूपच गाजले होते. कारण तिने आफ्रिकन आणि युरोपीय लूक कॅरी केला होता. या लूकमध्ये ती खूपच सुंदर पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबर तिचे द पॅनिक डे हे नाटकदेखील कायरो आंतरराष्ट्रीय महोत्सवात पोहोचले होते.