Join us

​‘फुंंतरु’ मध्ये शिवानीचा पहा किसींग सीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 06:03 IST

बॉलिवूडच्या पावलावर पाऊल ठेवत आता मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा बोल्ड सिनचा भडिमार होत आहे. म्हणजे हिंदी सिनेसृष्टी सारखी मराठी सिनेसृष्टीदेखील ...

बॉलिवूडच्या पावलावर पाऊल ठेवत आता मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा बोल्ड सिनचा भडिमार होत आहे. म्हणजे हिंदी सिनेसृष्टी सारखी मराठी सिनेसृष्टीदेखील बोल्ड होऊ लागली आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.नुकताच रिलीज झालेला केतकी माटेगावकर आणि मदन देवधर स्टारर ‘फुंतरू’ या मराठी चित्रपटाकडे शिवानीच्या किसींग सीन्समुळे तरुणांचे लक्ष वेधले गेले आहे. आपल्या पहिल्या आॅनस्क्रिन किसींग सीन विषयी शिवानी सांगते की, ‘हा चित्रपट आजच्या जमान्यातल्या महाविद्यायीन मुला-मुलींच्या नात्याकडे पाहण्याच्या वृत्तीवर भाष्य करणारा असून त्यात माझ्या श्रुती ह्या भूमिकेला एक किसींग सीन करायचा होता. युवापिढीची इमोशन्स व्यक्त करण्याच्या पद्धतींपैकी तो एक भाग होता. डायरेक्टर आॅफ फोटोग्राफी अर्चना बोराडे आणि सुजयने तो सीन खूप चांगला चित्रीत केला आहे. म्हणून त्यात कुठेही अश्लिलता वाटत नाही. मात्र सीन करताना थोडी धाकधूक होती. मात्र सुजयचा सपोर्ट होता त्यामुळे मी हे करू शकले’