रितेश बनणार शिवाजी महाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 21:10 IST
महाराष्ट्राचे आराद्य दैवत शिवाजी महाराज यांच्या पे्ररणादायी जीवनावर ‘छत्रपती शिवाजी’ या मराठी चित्रपटाची लवकरच निर्मिती होणार आहे. ऐतिहासिक काळामध्ये ...
रितेश बनणार शिवाजी महाराज
महाराष्ट्राचे आराद्य दैवत शिवाजी महाराज यांच्या पे्ररणादायी जीवनावर ‘छत्रपती शिवाजी’ या मराठी चित्रपटाची लवकरच निर्मिती होणार आहे. ऐतिहासिक काळामध्ये झालेला पराक्रमी योद्धा म्हणजे श्री छत्रपती महाराज यांनी आपल्या सामर्थ्याने मराठा साम्राज्य उभे केले.अशा या चित्रपटाचे शिवधनुष्य उचलेले आहे ते रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांच्या मुंबई फिल्म कंपनीने. ‘शिवाजी महाराज’ या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा रवी जाधव यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात रितेश देशमुखच शिवाजी महाराजांची चरित्र भूमिका साकारण्याची शक्यता आहे.