Join us

दमलेल्या बाबाची कहानी या चित्रपटाला सात नामांकने

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 17:28 IST

नितीन चव्हाण व योगेश जाधव लिखीत-दिग्दर्शित दमलेल्या बाबाची कहाणी या चित्रपटाला नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये एक नाही दोन नाही ...

नितीन चव्हाण व योगेश जाधव लिखीत-दिग्दर्शित दमलेल्या बाबाची कहाणी या चित्रपटाला नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल सात नामांकनं मिळाली आहेत. एका बापाची आणि त्याच्या मुलीची ह्दस्पर्शी कहाणी प्रेक्षकांना हया चित्रपटातून अनुभवता येणार आहे. सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट खलनायक, सर्वोत्कष्ट संगीत आणि सर्वोत्कृष्ट सामाजिक संदेश अशा विभागांमध्ये दमलेल्या बाबाची कहाणीला ही नामांकनं मिळाली आहेत. दमलेल्या बाबाची कहाणी हया चित्रपटात किशोर चौगुले, गीतकार-अभिनेते संदीप खरे, संस्कृती बालगुडे, ज्योती चांदेकर, आस्ताद काळे, दीप्ती भागवत, प्रवीण तरडे आदी कलाकारांचा समावेश आहे.