Join us

सावनीने पटकावला 'हा' पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 17:15 IST

           गायिका सावनी रवींद्रने अल्पावधीतच आपल्या गायकीने चित्रपटसृष्टीत आपला जम बसवला आहे. अनेक तरुण ...

 
          गायिका सावनी रवींद्रने अल्पावधीतच आपल्या गायकीने चित्रपटसृष्टीत आपला जम बसवला आहे. अनेक तरुण अभिनेत्रींना सावनीने आपला आवाज दिला आहे. नुकताच तिला महाराष्ट्र जर्नलिस्ट फाऊंडेशनतर्फे आदर्श युवा स्वराज्ञी पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कार संदर्भात सावनीने लोकमत सीएनएक्सशी संवाद साधताना सांगितले की, ''गायन क्षेत्रातील आदर्श युवा स्वराज्ञी हा पुरस्कार मला मिळाला आहे. पुरस्कार म्हणजे खरंच एक प्रकारची जबाबदारीच असते. तसेच कौतुकाची थाप देखील असतेच परंतु  पुरस्कार मिळाल्याने तुमच्यावरील एक जबाबदारीच वाढते.'' हा पुरस्कार म्हणजे माझ्या पुढील कार्यासाठी मला मिळालेली प्रेरणा आहे. त्यामुळे पुढे अधिकाधिक चांगले काम करण्याची उमेद मला या पुरस्काराच्या माध्यमातून मिळाली आहे. मी नक्कीच हा पुरस्कार ताकदीच्या स्वरुपात घेईन. या पुरस्काराचे मला शब्दात वर्णन करता येणारच नाही. मला खरेच हा पुरस्कार मिळाल्याने मी आनंदी आहे. सावनीने नेहमीच तिच्या गायकीने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. सर्व प्रकारची गाणी सहजतेने गाणारी सावनी सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची गायिका म्हणून ओळखली जाते. त्याच्या गायकीसाठी या आधीही अनेक पुरस्कार तिला मिळाले आहेत. आता पुन्हा एकदा तिने हा पुरस्कार पटकावून स्वत:चे नाव उंचावलेच आहे. आगामी अनेक मराठी चित्रपटांमध्ये आपल्याला सावनीचा आवाज ऐकायला मिळणार आहे. व्हर्सटाईल गायिका म्हणून देखील तिने चित्रपटसृष्टीत स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.