Join us  

'सर्व लाईन व्यस्त आहेत' चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 8:30 PM

'सर्व लाईन व्यस्त आहेत' या चित्रपटाची निर्मिती अमोल उतेकर यांनी केली असून कथा व दिग्दर्शन प्रदीप मेस्त्री यांनी केले आहे.

ठळक मुद्दे 'सर्व लाईन व्यस्त आहेत' ११ जानेवारी रोजी होणार प्रदर्शित

सर्व लाईन व्यस्त आहेत.....हे वाक्य आपण दिवसातून अनेकदा ऐकतो. नेहमी एकाच बाईच्या तोंडून सतत हे वाक्य ऐकल्याने ते आपल्या चांगलंच अंगवळणी पडले असले, तरी या नावाचा एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला आहे. 'सर्व लाईन व्यस्त आहेत' या चित्रपटाची निर्मिती अमोल उतेकर यांनी केली असून कथा व दिग्दर्शन प्रदीप मेस्त्री यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा बाब्या (सिद्धार्थ जाधव) व समीर (सौरभ गोखले) या दोघांभोवती फिरते. हे दोघे चाळीत राहणारे असतात. समीरचे वयाच्या चोवीसनंतर आईच्या वडिलांची कर्ज फेडण्यात जातात. त्यानंतर आईच्या तब्येतीमुळे वयाची एकतीशी उलटते आणि त्याचे लग्न जमत नसते. म्हणून त्याच्या घरातले त्याला एका बाबां (महेश मांजरेकर) कडे घेऊन जातात. ते बाबा जे सांगतात ते सगळे खरे होत असते. बाबा सांगतात की तुझे लवमॅरेज होणार आणि हा बोलतो की माझा मुलीशी बोलण्याचा कॉन्फिडंस नाही. तर माझे लव मॅरेज कसे होणार. समीरच्या अगदी उलट बाब्या असतो. तो एकदम डॅशिंग असतो व त्याचे बऱ्याच मुलींसोबत अफेयर असते. तो समीरला मुलींकडे कसे बघायचे व मैत्री करायचे शिकवतो. हळूहळू त्याचा मुलींच्या बाबतीत कॉन्फिडंस वाढतो. बाब्याच्या लग्नात त्याची एक्स गर्लफ्रेंड गोंधळ घालते. त्या गोंधळात समीर बाब्याला कसा सोडवतो, यावर आधारीत चित्रपट आहे. 

महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, हेमांगी कवी, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, कमलाकर सातपुते, गौरव मोरे, नीथा शेट्टी आणि राणी अगरवाल असे कॉमेडीचे हुकुमी एक्के असलेली मंडळी नव्या वर्षाचा नवा धमाका घेऊन येत आहेत. स्टेलारीया स्टुडीयो निर्मित, अमोल उतेकर प्रस्तुत आणि प्रदीप मेस्त्री दिग्दर्शित सर्व लाईन व्यस्त आहेत हा धमाल चित्रपट नव्या वर्षात म्हणजेच ११ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :महेश मांजरेकर सिद्धार्थ जाधवसौरभ गोखलेसंस्कृती बालगुडे