Join us  

Dharmaveer : पश्या बघ काय कमावलंयस तू...? संतोष जुवेकरनं प्रसाद ओकसाठी शेअर केला भावुक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 3:29 PM

Dharmaveer : ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने साकारलेल्या भूमिकेचं जोरदार कौतुक होतंय. आता एका माऊलीनं प्रसाद ओकच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. ही माऊली कोण तर अभिनेता संतोष जुवेकरची आई.

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe)यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer) हा सिनेमा सध्या चांगलाच गाजतोय. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक ( Prasad Oak)  याने साकारलेल्या भूमिकेचं तर जोरदार कौतुक होतंय. अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही प्रसाद ओकच्या भूमिकेचं भरभरून कौतुक केलंय. आता एका माऊलीनं प्रसाद ओकच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. ही माऊली कोण तर अभिनेता संतोष जुवेकरची (Santosh Juvekar) आई. होय, संतोष जुवेकरनं आईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडीओत संतोषची आई  प्रसाद ओकच्या ‘धर्मवीर’ सिनेमाच्या पोस्टरशी बोलताना दिसत आहे. ‘प्रसादने या सिनेमा खूपच सुंदर काम केलं आहे. सिनेमा इतका सुंदर आहे की मी माझ्या मैत्रिणींसोबत पुन्हा बघणार आहे. इतकं सुंदर काम केलं आहे ना प्रसादनी की डोळे भरून आलेत. असं वाटलं प्रत्यक्ष आनंद दिघे समोर आलेत. प्रसाद तुझा फोटो काढून आणलाये मी. मी त्याच्याशी बोलतेय. कधी एकदा मी प्रसादला भेटते, असं मला वाटतंय,’ असं त्या म्हणत आहेस.

 ‘पश्या बघ काय कमावलंयस तू.?माझी आई आज तिच्या आनंद दिघे साहेबांना बघून आली....’, असं कॅप्शन देत संतोषनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. आई एकदम खरं बोलल्या. हीच फिलींग आहे सगळ्यांची, असं एका चाहत्याने लिहिलं आहे.

 

अलीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील प्रसादच्या अभिनयाचे कौतुक केलं होतं. गेल्या रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘धर्मवीर’ हा चित्रपट पाहिला.  चित्रपट पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रसाद ओक याचं कौतुक केलं होतं. ‘चित्रपट फार सुंदर आहे,  अभिनेता प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांचा जो अभिनय केला आहे तो फारच जबरदस्त आहे.  प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांच्या  लकबी हुबेहुब साकारल्या आहेत, असं ते म्हणाले होते.

टॅग्स :संतोष जुवेकरप्रसाद ओक