Join us  

'डोंबिवली रिटर्न'चा टीजरला रसिकांची पसंती, 'या' तारखेला होणार प्रदर्शित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:54 PM

संदीप कुलकर्णी आणि राजेश्वरी सचदेव यांच्यासह हृषिकेश जोशी, अमोल पराशर,  त्रिश्निका शिंदे, सिया पाटील आदींच्या भूमिका आहेत.

लोकलचे खडखडणारे रूळ... मुंबई महानगरातली प्रचंड गर्दी... त्याबरोबरीनं येणारे प्रश्न... आणि मनातला कोलाहल... "डोंबिवली रिटर्न" जे जातं...तेच परत येतं? या चित्रपटाच्या टीजरमधून हे सगळं वेगवान आणि लक्षवेधी पद्धतीनं मांडण्यात आलं आहे. स्वाभाविकच या चित्रपटाची उत्सुकता आता आणखीनच वाढली आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला.

कंरबोला क्रिएशन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून संदीप कुलकर्णी, महेंद्र अटोले, गुरमित सिंग, कपिल झवेरी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. महेंद्र तेरेदेसाई यांनी  चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात संदीप कुलकर्णी आणि राजेश्वरी सचदेव यांच्यासह हृषिकेश जोशी, अमोल पराशर,  त्रिश्निका शिंदे, सिया पाटील आदींच्या भूमिका आहेत. उदयसिंग मोहिते यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून योगेश गोगटे यांचे संकलन आहे.राष्ट्रीय पारितोषिक विजेता शैलेंद्र बर्वे यांचे संगीत व पार्श्वसंगीत लाभले असून ध्वनी रेखांकन राष्ट्रीय पारितोषिक विजेते अनमोल भावे यांचे आहे.

"डोंबिवली रिटर्न" ही आजच्या काळातली गोष्ट आहे. एका मध्यवर्गीय कुटुंबाची, सर्वसामान्य माणसाची गोष्ट आहे. "डोंबिवली रिटर्न" हा सायकोलॉजिकल थ्रिलर प्रकारातील सिनेमा आहे. त्याचा पट खूपच मोठा आहे, असं संदीप कुलकर्णीने  सांगितलं. संदीप कुलकर्णी साकारत असलेल्या अनंत वेलणकर या व्यक्तिरेखेभोवती हा चित्रपट फिरतो. सर्वसामान्य आयुष्य जगणाऱया अनंत वेलणकरच्या आयुष्यात असं काय घडतं की त्याचं आयुष्य बदलून जातं याचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. चित्रपटाचा वेगवान टीजर पाहताना मुंबईच्या लोकलमध्ये धक्के खात प्रवास करणाऱया प्रत्येक सर्वसामान्य माणसाला आपलासा वाटेल असा हा चित्रपट असल्याचं स्पष्ट जाणवतं. २२ फेब्रुवारीला डोंबिवली रिटर्न" जे जातं...तेच परत येतं? प्रदर्शित होत आहे. 

 

टॅग्स :संदीप कुलकर्णीडोंबिवली रिटर्न