Join us

रंगा-पतंगामुळे संदीप गहिवरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2016 09:17 IST

          कोणताही चित्रपट असो तो प्रत्येक कलाकाराच्या जवळचाच असतो कारण त्या चित्रपटाशी त्या-त्या कलाकाराच्या आठवणी ...

          कोणताही चित्रपट असो तो प्रत्येक कलाकाराच्या जवळचाच असतो कारण त्या चित्रपटाशी त्या-त्या कलाकाराच्या आठवणी अन भावना जोडलेल्या असतात. असेच काही झाले आहे रंगा-पतंगा या सिनेमातील अभिनेता संदिप पाठक याच्या सोबत. रंगा-पतंगा या सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळी मकरंद अनासपुरे यांचे वडिल उपस्थित होते. सिनेमा संपल्यानंतर त्यांनी मकरंदला कडकडुन मिठी मारली अन त्याचे तोंडभरुन कौतुक केले. तिथेच उभ्या असलेल्या संदीपला देखील मकरंदच्या वडिलांनी मिठी मारली. या भावनिक प्रसंगामुळे संदिप खुपच गहिवरला अन त्याचे डोळे पाणावले. याबद्दल सांगताना संदिप म्हणाला, मी चित्रपटात काम करावे अशी माझ्या वडीलांची इच्छा होती. २००१ साली मी मुंबईत आलो अन माझी कारकिर्दी सुरु होण्यापुर्वीच माझे वडील गेले.  मकरंदच्या वडीलांनी मला मिठी मारल्यावर मला माझ्या वडीलांची आठवण झाली. याप्रसंगानंतर आम्ही दोघेही खुप रडलो, मकरंदला वडीलांची दाद मिळाली म्हणुन तर मला वडील नाहीत म्हणुन. रंगा-पतंगामुळे मकरंद आणि संदीपचे जुळालेले हे ऋणानुबंध कायम राहुदेत अशीच आपण अपेक्षा करुयात.