Join us  

Daagdi Chaawl 2 : भाईजानही ‘दगडी चाळ 2’च्या प्रेमात, अंकुश चौधरीच्या सिनेमासाठी सलमानची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 11:22 AM

Daagdi Chaawl 2 : अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे आणि पूजा सावंत यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘दगडी चाळ 2’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. अगदी भाईजान सलमान खानही (Salman Khan) या चित्रपटाच्या प्रेमात पडला आहे.  

‘दगडी चाळ’ या चित्रपट प्रचंड गाजला होता. आता या चित्रपटाचा पार्ट 2 अर्थात ‘दगडी चाळ 2’ (Daagdi Chaawl 2) येतोय. अंकुश चौधरी (Ankush Chaudhari), मकरंद देशपांडे (Makarand Deshpande) आणि पूजा सावंत (Pooja Sawant ) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. अगदी भाईजान सलमान खानही (Salman Khan) या चित्रपटाच्या प्रेमात पडला आहे. सलमानने एक खास पोस्ट शेअर करत, या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.

सलमानने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर ‘दगडी चाळ 2’च्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.‘राघू पिंजऱ्यात आला’ हे गाणं शेअर करत ‘Best wishes’ असं कॅप्शन त्याने लिहिलं आहे. हे गाणं शेअर करण्यामागे एक खास कारणही आहे. होय, सलमानची मैत्रिण डेजी शाह या गाण्यात थिरकताना दिसणार आहे. हे गाणं तिच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे.

सलमान खानच्या ‘जय हो’ चित्रपटाद्वारे  डेझी शाहने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. आता या गाण्याच्या निमित्ताने तिचा मराठीत डेब्यू होतोय.  मुग्धा कर्‍हाडे यांनी गायलेल्या आणि अमितराज यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘राघू पिंजऱ्यात आला’ या आयटम नंबरमधील तिच्या किलर परफॉर्मन्स सध्या चर्चेचा विषय बनला आहे. 

‘‘दगडी चाळ 2’  या चित्रपटाबद्दल सांगायचं तर, या चित्रपटाची कथा नेमकी काय असेल हे येत्या 18 ऑगस्टला समजेल. 18 ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होतोय. पण चित्रपटाची कथा यावेळी डॅडीचा विश्वासू सूर्याच्या भोवती फिरताना दिसेल, असं मानलं जातेय. ‘दगडी चाळ’ मध्ये डॅडीचा विश्वासू सूर्या ‘दगडी चाळ 2’मध्ये अचानक त्याचा तिरस्कार करताना दिसण्सार आहे. आता असं काय घडतं की सूर्या डॅडीचा इतका तिरस्कार करायला लागतो, हे पाहायला तुम्हाला चित्रपट पाहावा लागणार आहे.

टॅग्स :अंकुश चौधरीपूजा सावंतसिनेमासलमान खानडेझी शहा