Join us

​ यली मधून सायलीचे मराठीत पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 15:22 IST

अभिनेत्री सायली भगतने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांतून तिच्या अभिनयाची चुणूक दाखविलीच आहे. सायलीच्या द ट्रेन या चित्रपटातील गाणे चांगलेच हिट ...

अभिनेत्री सायली भगतने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांतून तिच्या अभिनयाची चुणूक दाखविलीच आहे. सायलीच्या द ट्रेन या चित्रपटातील गाणे चांगलेच हिट झाले होते. अता ही आपली मराठीमोळी मुलगी लवकरच एका मराठी चित्रपटामध्ये झळकणार असल्याचे समजतेय. यली नावाच्या मराठी चित्रपटामध्ये सायली एका दमदार भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे. मुळची नाशिकची असलेली सायली, फेमिना मिस इंडीया हा किताब देखील जिंकली आहे. त्यानंतर सायलीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये सायलीने स्वत:तील अभिनय सिदध करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू ती फारशी बॉलिवूडमध्ये प्रसिदध होऊ शकली नाही. पण आता सायलीच्या मराठमोळ््या चाहत्यांसाठी ही तर नक्कीच आनंदाची बातमी आहे की, ती लवकरच आपल्याला मराठी बोलताना दिसणार आहे. सायलीने याआधी तामिळ, तेलगु, कन्नड, पंजाबी, इंग्रजी या भाषांमध्ये चित्रपट केले आहेत. आता ती आपल्या मायभाषेत काम करण्यासाठी सज्ज झाली आहे. मॉडेलिंग आणि अ‍ॅक्टींगमध्ये करिअर करण्यात व्यस्त असलेली सायली मराठी यली या चित्रपटामध्ये सशक्त भूमिका साकारणार असल्याचे समजतेय. एका पोलिस इन्सपेक्टरच्या दमदार भूमिकेत ती पहिल्याच मराठी चित्रपटात दिसणार असल्याचे कळतेय. एका तडफदार महिला पोलिस अधिकाºयाची भूमिका सायली कशी निभावते हे पाहणे खरंच मनोरंजक असणार आहे. परंतू आता मराठी चित्रपटांचे बदलते स्वरुप पाहून अनेक बॉलिवूड कलाकारांनी मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पाहूयात आता आपली ही मराठमोळी मुलगी सायली मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:ची छाप उमटविण्यास यशस्वी होते का.