Join us  

​सैराटची आता लंडनपर्यंत मजल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2016 6:38 AM

संपूर्ण भारतात सैराटमय झालेल्या आर्ची-परशाच्या जोडीने आता लंडनमधील नागरिकांना आपल्या अभिनयाने याड लावायला सुरूवात केली आहे. दुबई, अमेरिकेतील प्रेक्षकांना ...

संपूर्ण भारतात सैराटमय झालेल्या आर्ची-परशाच्या जोडीने आता लंडनमधील नागरिकांना आपल्या अभिनयाने याड लावायला सुरूवात केली आहे. दुबई, अमेरिकेतील प्रेक्षकांना झिंगाट करुन सोडणारा ‘सैराट’ आता लंडनमध्ये ९ जुलैला रिलीज होणार आहे. सैराट रिलीज झाल्यापासून नवनवे विक्रमांचे इमले रचतोय. या चित्रपटाने ९० कोटीहून अधिक कमाई करत विक्रमाचा नवा उच्चांक गाठलाय. हा चित्रपट १०० कोटींच्या दिशेने वेगाने वाटचाल करतोय.