Join us

सैराट चित्रपटाच संगीत रेकॉडिंग थेट हॉलीवुडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 11:04 IST

 मराठी इंडस्ट्रीमध्ये नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने सध्या धुमाकूळ घातलेला दिसत आहे. या चित्रपटाचे एक एक यशस्वी पैलू ...

 मराठी इंडस्ट्रीमध्ये नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने सध्या धुमाकूळ घातलेला दिसत आहे. या चित्रपटाचे एक एक यशस्वी पैलू बाहेर पडताना दिसत आहे. प्रथम सैराट या चित्रपटाने बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ठसा उमठवून प्रेक्षकांना आकर्षित करून घेतले. यानंतर या चित्रपटतील अजय-अतूल यांच्या झिंगाट या गाण्याने तर सर्व रसिक प्रेक्षकांवर एक प्रकारे झिंगच चढविली. आता तर, थेट या चित्रपटातील अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथील हॉलिवूडमध्ये संगीताचं रेकॉर्डिंग करणारा 'सैराट' हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने भारतीय चित्रपट सृष्टीत एक नवा विक्रम प्रस्थापित करत मराठी इंडस्ट्रीला चार चाँदच लावले. अजय - अतुल या लोकप्रिय जोडगोळीने हॉलिवूडमधील सोनी स्कोअरिंग स्टुडिओ येथे या चित्रपटाच्या संगीताचं रेकॉर्डिंग केले आहे.'या स्टुडिओत त्यांनी ४५ जणांच्या वाद्यवृंदासोबत या चित्रपटाच्या संगीताचं रेकॉर्डिंग केले आहे. सेलो, व्हायोलिन, हार्प, हॉर्न, ब्रास अशा विविध वाद्यांवर त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. या स्टूडिओमध्ये यापूर्वी गॉन विथ द विंड, बेन हर, लॉरेन्स आॅफ अरेबिया यांसारख्या प्रथितयश चित्रपटांच्या संगीताचं रेकॉर्डिंग करण्यात आले होते. हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग हे नेहमीच या स्टूडिओत त्यांच्या चित्रपटाच्या संगीताचं रेकॉर्डिंग करतात. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाचे हे यश पाहता प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल हे नक्की.