Join us  

जाणून घ्या काय करतेय, सैराटमधील आर्चीची मैत्रीण आनी, अभिनय नव्हे तर या क्षेत्रात केले करियर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 1:14 PM

सैराट या चित्रपटात आर्चीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत म्हणजेच आनीच्या भूमिकेत आपल्याला अनुजा मुळेला पाहायला मिळाले होते.

ठळक मुद्देअनुजाने या चित्रपटात साकारलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली असली तरी अनुजा या चित्रपटानंतर पुन्हा कोणत्याच चित्रपटात दिसली नाही. 

सैराट या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड मोडले. या चित्रपटाची कथा, गाणी सगळेच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या चित्रपटातील सगळेच कलाकार प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. या चित्रपटात रिंकू राजगुरू, आकाश ठोसर यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटात छोट्याशा भूमिकेत दिसलेले कलाकार देखील प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत.

We are your Squad goals!! #Gang #PhotoLove #Pose #We5 #NthngCanSeperateUs #Love❤😍✌🖖 P.CAmit Bhokasese

Posted by Anuja Mulay on Monday, May 23, 2016

सैराट या चित्रपटात आर्चीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत म्हणजेच आनीच्या भूमिकेत आपल्याला अनुजा मुळेला पाहायला मिळाले होते. अनुजाने या चित्रपटात साकारलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली असली तरी अनुजा या चित्रपटानंतर पुन्हा कोणत्याच चित्रपटात दिसली नाही. 

Posted by Anuja Mulay on Friday, April 29, 2016

अनुजा चित्रपटात काम करत नसली तरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तिने Ask Me Now याद्वारे तिच्या फॅन्सशी गप्पा मारत तिच्या आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. अनुजा चित्रपटात काम करत नाहीये तर आता काय करते असे तिला अनेकांनी विचारले. त्यावर तिने वकिलाच्या कोटातील एक फोटो पोस्ट करत वकिली असे उत्तर दिले आहे. 

पुण्यात शिकत असताना अनुजाने एका एकांकिका स्पर्धेत भाग घेतला होता. यातील ‘चिट्ठी’ या एकांकिकेतील अभिनयासाठी तिला पारितोषिक मिळालं होतं. याचवेळी ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तिची निवड ‘आनी’च्या भूमिकेसाठी केली. तिने वकिलीत मास्टर्स केलेले आहे. 

टॅग्स :सैराट 2