Join us  

परशासोबतची ‘ती’ आहे तरी कोण? आकाश ठोसरने फोटो शेअर करताच चाहत्यांना पडला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 2:21 PM

रिअल लाईफ आर्ची की आणखी कुणी?

ठळक मुद्देपरशा उर्फ आकाश ठोसरचा जन्म त्याच्या मुळ गावी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे २४ फेब्रुवारी १९९३ रोजी एका सामान्य कुटूंबात झाला.

परशा आर्ची आली आर्ची... हा डायलॉग कानावर जरी पडला तरी ‘सैराट’ चित्रपटातील सीन डोळ्यासमोर उभा राहतो. ‘सैराट’ने व त्यातील परशा आणि आर्ची यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. म्हणायला ‘सैराट’ रिलीज होऊन पाच वर्षे उलटलीत पण आजही आर्ची व परशा या नावांची जादू कायम आहे. तर आज परशा उर्फ आकाश ठोसर  याच्याच बद्दलची एक ‘सैराट’ करणारी बातमी आहे.होय, आकाशने नुकतेच त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत आणि चाहते ‘सैराट’ झालेत. या फोटोत एक सुंदर मुलगी आहे. हा फोटो पाहून परशाची रिअल लाईफ आर्ची हीच तर नाही ना, असा प्रश्न अनेकांना पडला. त्याचवेळी ‘आहे का कुणी अशी? असेल तर सांगा...’ असे लिहित आकाशने चाहत्यांचा गोंधळ वाढवला.

मग काय, ती कोण? या प्रश्नाने सर्वांना ग्रासून सोडले. अर्थात काही वेळाने याचा खुलासाही झाला.होय, फोटोतील ही तरूणी दुसरी तिसरी कोणी नसून स्वत: आकाश आहे. धक्का बसला ना? पण हे खरे आहे. होय, ही तरूणी म्हणजे, आकाशचे  फेस अ‍ॅपमध्ये एडिट केलेले फोटो आहेत. अ‍ॅपच्या मदतीने आकाशने त्याचे फिमेल लूकमधील फोटो बनवलेत आणि तेच सोशल मीडियावर शेअर केलेत.

गेल्या काही दिवसांपासून स्त्रियांचा मेल लूक  आणि पुरूषांचा फिमेल लूक कसा दिसेल, हे जाणून घेण्याचा ट्रेंड आला आहे. अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही तुमचा लूक बदलू शकता. आकाशलाही याच अ‍ॅपच्या मदतीने स्वत:चे फिमेल लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

परशा उर्फ आकाश ठोसरचा जन्म त्याच्या मुळ गावी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे २४ फेब्रुवारी १९९३ रोजी एका सामान्य कुटूंबात झाला. सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी आकाश पैलवान होता.  आकाशने पुण्याच्या एस पी एम मधून त्याचे शालेय शिक्षण पूर्ण केले.  कॉलेजमध्ये असताना वेगवेगळ्या नाटकात तो अभिनय करायचा. तेव्हापासून त्याने अभिनयात करिअर करायचे ठरवले म्हणून त्याने एका आॅडीशनसाठी हजेरी लावली. तेव्हा मात्र या पहिल्याच आॅडिशनमध्ये त्याचे सिलेक्शन झाले. तेही सहाय्यक कलाकार म्हणून नाही तर मुख्य अभिनेता म्हणून झाले. हा चित्रपट होता दिग्दर्शक नागराज मंजूळे लिखीत सैराट.

टॅग्स :आकाश ठोसर