Join us  

आर्ची आधीची..., आर्ची आत्ताची...!  रिंकूचे नवे फोटो पाहून चाहते म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2021 3:17 PM

कुठे ‘सैराट’ची ती रांगडी आर्ची अन् कुठे आत्ताची सुपरफिट रिंकू. होय, ‘सैराट’नंतर जणू रिंकूचा कायापालट झाला आहे.

ठळक मुद्देतिच्या  रिफ्रेशिंग फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

2016 मध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या चित्रपटाने अख्ख्या महाराष्ट्राला याड लावलं. या चित्रपटातल्या कलाकार मंडळींनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. आर्ची, परश्या, सल्या आणि लंगड्या या भूमिका साकारणारे सगळेच चर्चेत आले. आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू ( Rinku Rajguru) तर एका रात्रीत स्टार झाली. अर्थात ही आर्ची आता पहिल्यासारखी राहिलेली नाही. कुठे ‘सैराट’ची ती रांगडी आर्ची अन् कुठे आत्ताची सुपरफिट रिंकू. होय, ‘सैराट’नंतर जणू रिंकूचा कायापालट झाला आहे.

 तिनं वाचन वाढवलं. वेगवेगळे चित्रपट पाहिले. वेगवेगळ्या लोकांमध्ये वावरू लागले. शिवाय तिनं तिच्या फिटनेसकडेही लक्ष दिलं. वजन आवाक्याबाहेर जात असल्याचं जाणवल्यानंतर रिंकू राजगुरूनं वजन कमी करण्याचं ठरवलं आणि योग्य आहार आणि व्यायामाच्या जोडीने स्वत:मध्ये चांगला बदल घडवून आणला. तिचे हे ताजे फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही रिंकूतील बदल लक्षात येईल. सोशल मिडीयावर रिंकू आपले नवनवीन फोटोशूट चाहत्यांशी शेअर करत असते. आत्ताही तिनं काही नवे फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत तिच्यासोबत तिचा लाडका कुत्रा पाहायला मिळतोय. तिच्या  रिफ्रेशिंग फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

आता या फोटोवरच्या कमेंट्सही सांगायलाच हव्या. अनेकांनी आर्चीच्या या सुपरकुल, सुपरफिट फोटोंचं कौतुक केलं आहे. पण काही चाहते मात्र रिंकूचे हे नवे फोटो पाहून काहीसे नाराज आहे. ‘मला तर आपली आधीचीच आर्ची आवडायची,’ कशी कमेंट एका युजरने केली आहे. एका युजरने ‘मराठी व्हर्जन ऑफ दिशा पाटनी’ अशी कमेंट केली आहे. अर्थात या कमेंट्स मोजक्याच. कारण रिंकू मस्त दिसतेय, बारीक झालीयेय, सुंदर, आमची आर्ची लय भारी, अशा कमेंट्ची संख्या कितीतरी जास्त आहे. 

टॅग्स :रिंकू राजगुरू