Join us  

एक म्हणतोय लग्न कर..तर दुसरा म्हणतो मॅडम.., सई ताम्हणकरच्या हटके फोटोशूटवर चाहते करताहेत अजब कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 12:27 PM

आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. सई ताम्हणकरने छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. सईने मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले आहे. तिने हंटर, लव्ह सोनियो या हिंदी चित्रपटात काम केले आहे.

आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. बोल्ड आणि बिनधास्त अशी सईची ओळख आहे.सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रीय असते. तिचे फोटो व्हिडीओ ती चाहत्यांसह शेअर करत असते. अलीकडेच तिने तिचे हटके स्टाईल फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. या फोटोत शॉर्ट ड्रेसवर वेणी  घालून सई पोझ देताना दिसतेय. सईचे हे फोटो पाहून एका चाहत्यांना लिहिले, असं वाटत आहे सई मॅडम जुमानजी चित्रपटात होत्या कारण त्यांच्या हातावर फक्त 2 लाइफ लाइन उरल्या आहेत. तर दुसरा म्हणतो तब्यत वाढवा मॅडम तिसऱ्याने तर सईल लग्न करण्याचा थेट सल्ला दिला आहे. 

नुकतेच सईच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेलाय. सईला IMDBच्या Best of 2021 च्या यादीत मानाचं स्थान मिळालं आहे. Internet Movie Database (IMDB) ने नुकतीच Top 10 Breakout stars of Indian films and webseries 2021 ची लिस्ट जाहीर केली. ह्या यादीमध्ये IMDB ने सईचा उल्लेख करून तिचा गौरव केला आहे.सईने यंदा समांतर, नवरसा आणि मीमी ह्या तीन वेगवेगळ्या भाषांच्या कलकृतींमधून वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांव्दारे रसिकांच्या मनावर आपली अमीट छाप सोडली. IMDB ने ह्याची दखल घेत सईला ‘breakout star’ म्हटले आहे.

टॅग्स :सई ताम्हणकर