Join us  

डोक्यापासून ते पायापर्यंत साडीने झाकला 'या' अभिनेत्रीने स्वतःला, पाहून नेटकरीही झाले आवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 3:29 PM

सिनेमाचं प्रमोशन करण्याचे निरनिराळे फंडे चित्रपटसृष्टीत पाहायला मिळतात... त्यामुळे सिनेमाच्या शूटिंगपासून कलाकाराचे अशा प्रकारचे प्रमोशन फंडेही सध्या हिट ठरत आहेत.

सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे विविध फोटो आणि व्हिडीओ, त्यांच्या आगामी प्रोजेक्टसची माहिती चाहत्यांसह शेअर करत असतात. एरव्ही ग्लॅमरस आणि हटके फोटो शेअर करत लक्ष वेधून घेणा-या सई ताम्हणकरच्या या फोटोने चाहत्यांना संभ्रमात टाकले आहे. सईचे हा फोटो पाहून चाहते  अवाक् झाले आहेत.

अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी चित्रपटसृष्टीत बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते.ती नेहमी काही तरी हटके करण्याचा प्रयत्न करत असते. सईचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालतात. मराठी मनोरंजन विश्वाची ‘फॅशनिस्टा’ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे आगामी सिनेमात तिचा लूक कसा असणार याबाबतही अनेक प्रश्न चाहत्याना पडले आहेत.

सोशल मीडियावर अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या चाहत्यांसाठी विविध फोटो पोस्ट करताना दिसते. अनेक नानाविविध लुक्स आणि गेटअपमधून सई चाहत्यांची मनं जिंकत असते. मात्र हा फोटो पाहून  युजर्सही ''ओ स्त्री कल आना'', ''सईला थंडी वाजते का ?'' अशा भन्नाट कमेंट करत मजाही घेताना दिसत आहेत. तर काहींना मात्र तिच्या या फोटोमुळे आत्तापासून नवीन सिनेमा पाहण्याची उत्सुकता असल्याचे दिसतंय.

हा फोटो शेअर करत सईने आगामी सिनेमाची शूटिंगला सुरुवात केल्याचे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. त्याचदरम्यान तिने असा फोटो शेअर करत चाहत्यांना सिनेमाविषयी माहितीही दिली आहे. सिनेमाचं प्रमोशन करण्याचे निरनिराळे फंडे चित्रपटसृष्टीत पाहायला मिळतात... त्यामुळे सिनेमाच्या शूटिंगपासून कलाकाराचे अशा प्रकारचे प्रमोशन फंडेही सध्या हिट ठरत आहेत. सईने शेअर केलेला हा फोटो प्रमोनचाच भाग आहे. 

सिनेमात नेमकी तिची कशी आणि कोणती भूमिका असणार याबाबत तिने फारशी माहिती दिली नाहीय. त्यासाठी चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागणार हे मात्र नक्की. 

टॅग्स :सई ताम्हणकर