Join us  

सई ताम्हणकर सांगणार, दोन टोकांचा मध्य साधणारी गोष्ट, वाचा ती काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 3:13 PM

सई ताम्हणकर नेहमीच आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंना घेऊन सोशल मीडियावर चर्चेत असते. सई सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते.

ठळक मुद्देसई ताम्हणकर मराठी रसिकांची दिलों की धडकन म्हणून ओळखली जातेसईने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे

सई ताम्हणकर नेहमीच आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंना घेऊन सोशल मीडियावर चर्चेत असते. सई सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. तिने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तिचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे. सई ताम्हणकर मराठी रसिकांची दिलों की धडकन म्हणून ओळखली जाते. आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. सईने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोत सईसोबत ललित प्रभाकर आणि पर्ण पेठेसुद्धा आहे. या फोटोला सईने मीडियम Spicy”. दोन टोकांचा मध्य साधणारी गोष्ट! असे कॅप्शन सुद्धा दिले. फोटो पाहुन एकंदर सई ललित प्रभाकरसोबक लवकरच स्क्रिन शेअर करताना दिसणार असल्याचे कळतेय. सई पहिल्यांदाच ललित सोबत काम करताना दिसणार आहे.  याआधी सईने बोल्ड की सोज्वळ असा फोटो इन्स्टावर शेअर केला होता. 

याशिवाय सई वैभव तत्त्वादीसोबत पाँडेचेरी सिनेमात काम करणार आहे. या सिनेमात सईसह नैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी झळकणार आहेत. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग पाँडेचेरीमध्ये करण्यात आले आहे.

सचिन कुंडलकर आणु तेजस मोडक यांनी या चित्रपटाची कथा लिहली असून हा एक कौटुंबिक विषयावर आधारित चित्रपट आहे. 

टॅग्स :सई ताम्हणकर