Join us  

सई ताम्हणकरला IMDBच्या top 10 stars मध्ये मिळालं मानाचं स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 11:50 AM

सईने यंदा समांतर, नवरसा आणि मीमी ह्या तीन वेगवेगळ्या भाषांच्या कलकृतींमधून वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांव्दारे रसिकांच्या मनावर आपली अमीट छाप सोडली. I

आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. बोल्ड आणि बिनधास्त अशी सईची ओळख आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच यशाची नवनवी शिखरं पादाक्रांत करताना दिसते. सईच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेलाय. सईला IMDBच्या Best of 2021 च्या यादीत मानाचं स्थान मिळालं आहे.

Internet Movie Database (IMDB) ने नुकतीच Top 10 Breakout stars of Indian films and webseries 2021 ची लिस्ट जाहीर केली. ह्या यादीमध्ये IMDB ने सईचा उल्लेख करून तिचा गौरव केला आहे.सईने यंदा समांतर, नवरसा आणि मीमी ह्या तीन वेगवेगळ्या भाषांच्या कलकृतींमधून वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांव्दारे रसिकांच्या मनावर आपली अमीट छाप सोडली. IMDB ने ह्याची दखल घेत सईला ‘breakout star’ म्हटले आहे.

 

ह्या सन्मानाविषयी अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणते,” आयएमडीबी हा ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे. कलाकृतीला भाषेचं बंधन न लावता, त्याकडे पाहण्याचा विस्तीर्ण दृष्टिकोण ग्लोबल सिनेमाचा आणि वेबसीरिजचा असतो. अशा ठिकाणी माझ्या कामाचा गौरव होणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आयएमडीबी सारख्या प्रतिथयश प्लॅटफॉर्मने आपल्या कामाचा असा गौरव करावा ही आनंदाचीच गोष्ट आहे.”

टॅग्स :सई ताम्हणकर