Join us

लव्ह सोनियाच्या निमित्ताने सई ताम्हणकरने घेतली ऑस्कर विजेते रेसुल पोकुटी यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2017 12:23 IST

सई ताम्हणकरने दुनियादारी, बालकपालक, नो एंट्री पुढे धोका आहे यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तसेच हंटर या ...

सई ताम्हणकरने दुनियादारी, बालकपालक, नो एंट्री पुढे धोका आहे यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तसेच हंटर या हिंदी चित्रपटातील तिची भूमिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. आता ती लव्ह सोनिया या इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये काम करत आहे. हा चित्रपट मुलींचे अपहरण आणि त्यांच्यावरील लैंगिक अत्याचार या विषयावर भाष्य करणार आहे. या चित्रपटात फ्रिडा पिंटो, अनुपम खेर, पॉल डानो, मनोज वाजपेयी, राजकुमार राव आणि रिचा चढ्ढा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या दिग्गजांसोबत या चित्रपटात सईचीदेखील वर्णी लागलेली असल्याने ती प्रचंड खूश आहे. या चित्रपटासाठी सई चांगलीच उत्सुक आहे. लव्ह सोनिया या चित्रपटाच्या निमित्ताने सई नुकतीच ऑस्कर पुरस्कार विजेते साऊंड डिझायनर आणि एडिटर रेसुल पोकुटी यांना अंधेरीतील एका स्टुडिओत भेटली. त्यांच्या भेटीचा अनुभव खूपच चांगला असल्याचे सईने म्हटले आहे. सई सांगते, "लव्ह सोनिया या माझ्या आगामी चित्रपटाच्या डबिंगसाठी मी रेसुल यांना भेटले होते. यांच्यासोबत काम करायला मिळतेय याचा मला खूप आनंद होत आहे. ते इतके प्रसिद्ध असूनही प्रचंड जमिनीवर आहेत. त्यांना कोणत्याच गोष्टीचा गर्व नाहीये. त्यांच्यासारख्या लोकांसोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला असतो." रेसुलनेदेखील सईची स्तुती केली आहे. त्यांनी सईसोबतचा एक फोटो ट्विटरवर अपलोड करून सईबाबत एक ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "सई खूपच टायलेंटेड आहे. तिच्यासोबत मी नुकतेच डबिंग केले. डबिंगचा अनुभव खूपच छान होता. आम्ही दोघे एकत्र काम करत असल्याचा मला खूपच आनंद होत आहे."