Join us  

लग्नानंतर सई लोकुरचा बदलला अंदाज, फोटोंनी वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 6:30 PM

लग्नातही सई लोकुरचा अंदाज सा-यांच्या पसंतीस पात्र ठरला होता. तीर्थदीप रॉयसह लग्नबंधनात अडकलेली सई कुटुंबासह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहे.

सोशल मीडियावर सई लोकुर नेहमीच सक्रीय असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. चाहत्यांकडून वाहवा मिळवताना दिसते. सई लोकुरने नवीन फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये ट्रेडिशनल किंवा वेस्टर्न अशी कोणतीच स्टाइल नसून थेट रेट्रो लूक पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. इतर अभिनेत्रींप्रमाणे सई लोकुरदेखील आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत जास्त सजग झाली आहे. 

 

प्रत्येकाचा फॅशन फंडा वेगवेगळा असतो. प्रत्येकाची आपली स्टाईल असते. तिच्या इन्स्टावर नजर टाकली तर तुम्हाला कळेल की अमुकएक फॅशन तिने कधीच फॉलो केलेली नाही. कधी वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसते तर कधी ट्रेडिशनल लूकमध्ये पाहायला मिळते. सई लोकुर लग्नानंतर प्रचंड चर्चेत आहे. तिच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्याचीही चाहत्यांना उत्सुकता असते. त्यामुळेच की काय तिच्या फॉलोअर्सच्या संख्येतही वाढ होत आहे. 

लग्नातही सई लोकुरचा अंदाज सा-यांच्या पसंतीस पात्र ठरला होता. तीर्थदीप रॉयसह लग्नबंधनात अडकलेली सई कुटुंबासह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ती मस्त फिरण्याचाही आनंद लुटत आहे.

 

विविध पर्यटनस्थळांची सफारी आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. त्यामुळे कामात बिझी होण्याआधी ती वेगवेगळ्या ठिकाणी फिरते. तिच्या भटकंती दरम्यानच्याही अपडेट तो सोशलम मीडियावर शेअर करताना दिसते. त्यामुळे लग्नानंतरचीही मॅरिड लाईफचा ती फुल ऑन मजा लुटताना दिसत आहे.  

टॅग्स :सई लोकूर