Join us  

'या' क्रिकेटपटूला भेटायचं आहे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकरला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 4:47 PM

नुकतेच प्रसादने आपला आवडत्या क्रिकटरला भेटण्याची इच्छा अपुरी राहिल्याचे सांगितले. 

विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारा कलाकार म्हणजे प्रसाद खांडेकर. विनोदाची डबल डेकर अशी ओळख त्याने मिळवली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचा चेहरा बनलेला प्रसाद हा एक उत्तम नट आहे. अभिनेता असण्याबरोबरच प्रसाद लेखक, दिग्दर्शकही आहे. तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. नुकतेच प्रसादने आपला आवडत्या क्रिकटरला भेटण्याची इच्छा अपुरी राहिल्याचे सांगितले. 

प्रसाद खांडेकरने राजश्री मराठीला मुलाखत दिली. यावेळी त्याने क्रिकेटवर भाष्य केलं. तो म्हणाला, 'मी क्रिकेटसाठी वेडा आहे. माझ्यासोबतच्या सगळ्यांना माहिती आहे. सर्व जण मला ओरडतात. आताही मी पॅकअप झाल्यानंतर खेळायला जातो. क्रिकेट खूप आवड आहे माझी. मला सचिनला भेटण्याची खूप इच्छा आहे. ती अजून पुर्ण झाली नाही. दोना योग जुळून आला पण, भेट राहुन गेली'. 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, नुकताच त्याचा 'एकदा येऊन तर बघा' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. शिवाय, प्रसादने अनेक नाटकांचं दिग्दर्शनही केलं आहे. त्याचं 'कुर्रर्र' हे नाटक सध्या गाजत आहे. हास्यजत्रेतील अनेक स्किटचं प्रसाद लेखन आणि दिग्दर्शन करतो.  हिंदी आणि गुजराती रंभभूमीवरही त्याने लेखक दिग्दर्शक म्हणून आपला ठसा उमटविला आहे. कित्येक वर्षांपासून प्रसाद चाहत्यांचं मनोरंजन करतोय.

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीमहाराष्ट्राची हास्य जत्रा