Join us  

सचिन दूबाले पाटीलचा सिनेइंडस्ट्रीत सिक्सर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 3:21 PM

जवळपास अर्धा डझन चित्रपटांसाठी कार्यकारी निर्माता म्हणून चोख कामगिरी बजवणारा सचिन मोठ्या हिमतीने चित्रपटसृष्टीत प्रामाणिकपणे काम करतो आहे.

सचिन हे नाव प्रत्येक माणसाच्या ह्रदयाजवळचे आहे. सचिन हे नाव म्हणजे आत्मविश्वास, धैर्य, जिद्द, चिकाटी असे खूप काही  सांगून जाते. सचिन दूबाले पाटील या नावाचे वादळ सध्या चित्रपटसृष्टीत घोंगावत आहे. मूळचा बीडचा असणारा हा युवक कामानिमित्ताने पुण्यात आला आणि त्याने त्याच्या आयुष्याचा प्रवास अत्यंत बिकट परिस्थितीतून सुरू केला. कोणतेही काम कमी न समजता त्याने हाताला मिळेल ते काम सुरू केले. जवळपास अर्धा डझन चित्रपटांसाठी कार्यकारी निर्माता म्हणून चोख कामगिरी बजवणारा सचिन मोठ्या हिमतीने चित्रपटसृष्टीत प्रामाणिकपणे काम करतो आहे. कार्यकारी निर्माता म्हणून सचिनने नुकताच सिक्सर मारला आहे. त्याच्या हिमतीला दाद दयायला हवी. 

सचिन दूबाले पाटील याने  नुकताच बहुचर्चित बिग बजेट असणारा व मल्टीस्टार कास्ट असणारा अ.ब. क या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता म्हणून त्याने धुरा संभाळली होती. या अगोदर त्याने आयटमगिरी, बाजार, हेडलाईन, आगामी प्रदर्शित होणारे आटपाडी नाईट्स, खिचीक, कॉलेज डायरी असे त्याचे चित्रपट आहेत.सचिनच्या बरोबर सावली सारखा असणारा त्याचा जीवभावाचा मित्र विष्णू घोरपडे आणि सचिन मोठया हिंमतीने चित्रपट सृष्टीत काम करत असून दिवसेंदिवस त्यांच्या कार्याचा आलेख हा चढता आहे, असे सचिन याने सांगितले. मोठ्या मेहनतीने सचिनने कार्यकारी निर्माता म्हणून सिक्सर मारला आहे.