Join us  

लग्नानंतर या देशात भटकंतीचा आनंद घेतेय सोनाली कुलकर्णी, पतीसोबतचा फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 4:00 PM

सोनाली कुलकर्णीने पतीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. फोटो पाहूनच चाहत्यांना लाईक्स आणि कमेंट्स देत पसंती देत असल्याचे पाहायला मिळतंय.

नुकतेच लग्नबंधनात अडकलेली सोनाली कुलकर्णी लॉकडाऊनमध्ये घरातच विविध गोष्टी करताना दिसली. लग्नही तिने लॉकडाऊनमध्ये करत चाहत्यांनाही आनंदाची बातमी दिली होती. सोनाली आणि कुणाल दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री असल्याचे पाहायला मिळते. दोघंही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतात. सोनाली सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध पोस्ट शेअर करत असते.नेहमीच त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून पोस्ट पाहणाऱ्यांना आणि वाचणाऱ्यांना काही ना काही सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा देत असते. 

सोशल मीडियावर सोनालीचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे चाहते सोनालीची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यात प्रचंड उत्सुक असतात. न्युलीवेड कपल सध्या काय करते आणि कुठे आहे याची उत्तरं सोशल मीडियावरच मिळतील. बिझी शेड्युअलमधून वेळ काढत सोनाली आणि कुणाल दोघंही निवांत एकत्र वेळ घालवत असून सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. याच स्पेशल क्षणांचे फोटो दोघांनीही आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केले आहेत. 

सोनालीने पतीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. फोटो पाहूनच चाहत्यांना लाईक्स आणि कमेंट्स देत पसंती देत असल्याचे पाहायला मिळतंय. आता हळहळू सगळेच अनलॉक होतंय. सर्वसामान्यासोबतच सेलिब्रेटीमंडळीदेखील आता घराबाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे लग्नानंतर सोनाली कुलकर्णी देखील मस्त भटकंती करताना दिसतेय. पती कुणाल बेनोडेकरसह फोटो शेअर करत तिने लिहीले आहे की, कुणालला भेटण्यापूर्वी एकटीच ती ट्रॅव्हल करायची तर कधी फॅमिली फ्रेंडसोबत तिची ट्रॅव्हलिंगची आवड पूर्ण करायची.कुणालला भेटल्यानंतर तिला ट्रॅ्व्हल पार्टनरच मिळाला. 

कारण सोनालीप्रमाणेच कुणाललादेखील विविध स्थळांना भेट द्यायला आवडते. विविध ठिकाणी भटकंती करायला आवडते. दोघांचेही सारखीच आवडी- निवडी असल्याचे सोनालीच्या या फोटोवरुन स्पष्ट होते.तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत. तसेच काही व्हिडीओही शेअर केले आहेत. सोनाली निवांत क्षण एन्जॉय करताना दिसते. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये समुद्रकिनारी झोपाळ्याचा आनंदही घेताना ती दिसत आहे. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णी