Join us  

रोहित फाळके आणि सुमेध मुदगलकरची लाडकी अश्विनी भावे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2017 6:28 AM

मांजा या चित्रपटात रोहित फाळके जयदीप तर सुमेध मुदगलकर विकीची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून ...

मांजा या चित्रपटात रोहित फाळके जयदीप तर सुमेध मुदगलकर विकीची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटातील रोहित आणि सुमेधच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक होत आहे. या चित्रपटाच्या आपल्या प्रवासाविषयी रोहित सांगतो, मी या चित्रपटाचे साहाय्यक दिग्दर्शक ओमकार जोशी यांच्यासोबत काम केले होते. त्यांनीच मला या चित्रपटाच्या ऑडिशनविषयी सांगितले. मी या चित्रपटातील जयदीप आणि विकी या दोन्ही भूमिकांसाठी ऑडिशन दिले होते. ऑडिशनमधून माझी निवड करण्यात आली. त्यानंतर जयदीप या भूमिकेला अनेक छटा असल्याने मला ही भूमिका साकारण्याची इच्छा होती. त्यामुळे ही भूमिका मी साकारू का असे मी विचारले आणि या भूमिकेचा मी भाग झालो. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव तर खूपच छान होता. आम्ही या चित्रपटाचे चित्रीकरण महाबळेश्वर, पाचगणी येथे ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये केले होते. त्यावेळी कधी तरी अचानक पाऊस पडायचा तर कधी अचानक धुके यायाचे. त्यामुळे चित्रीकरण करणे हे खरे तर खूप कठीण होते. पण या सगळ्यातही मी या चित्रपटाचे चित्रीकरण एन्जॉय केले. चित्रपटात अश्विनी ताई माझ्या आईच्या भूमिकेत आहेत हे कळल्यावर सुरुवातीला तर मला दडपण आले होते. पण त्या ज्येष्ठ अभिनेत्री असल्याचे त्यांनी मला कधीच जाणवू दिले नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल असलेली भीती क्षणात दूर झाली. त्या चित्रपटाच्या सेटवरदेखील एखाद्या आईप्रमाणे आमची काळजी घ्यायचे. तर या चित्रपटात विकीची भूमिका साकारणाऱ्या सुमेधला या चित्रपटाची कथा खूपच आवडली होती. पण त्याचवेळी त्याचे एक प्रोजेक्ट सुरू असल्याने हा चित्रपट कसा करायला हा त्याला प्रश्न पडला होता. याविषयी तो सांगतो, माझे एक प्रोजेक्ट काहीच दिवसांत सुरू होणार होते. त्याची जोरदार तयारी सुरू होती आणि त्याच वेळी मला मांजा या चित्रपटाविषयी सांगण्यात आले होते. मला या चित्रपटाची पटकथा ऐकल्यावर मी या चित्रपटाच्या कथेच्या प्रेमात पडलो होतो. पण वेळ नसल्याने मी चित्रपटासाठी नकार देण्याचा विचार केला होता. पण अचानक माझे प्रोजेक्ट रद्द झाले आणि मी या चित्रपटाचा भाग झोलो. मी याआधी मालिकेत काम केले आहे. मालिकेत काम करणे आणि चित्रपटांमध्ये काम करणे यात खूप फरक असल्याचे मला जाणवले. चित्रपटात व्यक्तिरेखेतले प्रत्येक बारकावे टिपले जातात असे मला वाटते. विकी ही व्यक्तिरेखा तर सुरुवातीला मला खूपच कठीण वाटली होती. पण चित्रीकरणादरम्यान ती मी अधिकाधिक समजून घेतली आणि त्याची मला ही व्यक्तिरेखा साकारण्यास अधिक मदत झाली. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अश्विनी ताई आमच्यासोबत मजा मस्ती करायच्या. त्यांनी आम्हाला खूप कर्म्फटेबल केले. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना आम्हाला टेन्शन आले नाही. Also Read : आणि अशाप्रकारे सुरू झाला मांजाचा प्रवासः जतिन वागळे