Join us  

पिळदार शरीरयष्टीचा 'रॉकी' येतोय भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 8:16 PM

'रॉकी' हा अॅक्शनपॅक्ड सिनेमा ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

आजच्या तरुणाईला अॅक्शनपटांचे विशेष आकर्षण आहे. अॅक्शन सोबतच इमोशन आणि त्याच्या जोडीला ठसकेबाज संवाद हे समीकरण जुळले तर प्रेक्षक त्या चित्रपटाला उचलून धरतात. असाच अॅक्शन आणि इमोशनने परिपूर्ण असलेला 'रॉकी' हा अॅक्शनपॅक्ड सिनेमा ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

‘सळसळते रक्त आणि अंगात रग, वाटेला गेलात याच्या तर बाजार उठलाच म्हणून समजा’ असा इशारा देत रॉकी सिनेमाचे पोस्टर नुकतंच लाँच झालं. सिनेमाच्या टीजरला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. एकूणच या टीजर आणि पोस्टरमुळे या चित्रपटाबाबतीत प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. पोस्टरवर दिसणारा पिळदार शरीरयष्टीचा हा तरुण नेमका आहे तरी कोण? हे अद्याप समजू शकलेले नाही. तसेच या चित्रपटातील इतर कलाकारांबाबत व कथेबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही. या चित्रपटाची निर्मिती ड्रीम व्हिवर प्रोडक्शन्स आणि सेवेन सीज प्रोडक्शन्स यांची असून प्रस्तुती पेपरडॉल एण्टरटेन्मेंट यांची आहे. या चित्रपटाचे निर्माते प्रशांत त्रिपाठी, मनेश देसाई, नितीन शिलकर, हिमांशू अशर आहेत. चित्रपटाची कथा-पटकथा दिग्दर्शन अदनान शेख यांचे आहे. रॉकीच्या भूमिकेत कोणता अभिनेता पाहायला मिळणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.