Join us  

रिंकू राजगुरुच्या नवीन व्हिडीओने वेधले लक्ष, होतोय कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 11:41 AM

रिंकू आज खूप लोकप्रिय अभिनेत्री पैकी एक आहे.असे असले तरीही रींकूचे राहणीमान, वागणं यातील साधेपणा कायम आहे.

अभिनयासह सेलिब्रिटी मंडळी वेगवेगळ्या गोष्टीतही रमताना दिसतात.  आपल्या आवडीनिवडीच्या गोष्टींसाठी वेळ राखून ठेवतात. अनेक कलाकार आपले छंद आणि आवड जपताताना पाहायला मिळत आहेत. अमराठीत सर्वाधिक लोकप्रिय असेलली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु ती जे काही करते तिची चर्चाही होतेच.रिंकू राजगुरु सोशल मीडियावर सक्रीय असते. सिनेमाव्यतिरिक्त तिच्या खासगी आयुष्यात ती काय काय करते या सगळ्या गोष्टी ती चाहत्यांसह शेअर करते. तसेच लाडक्या आर्चीबद्दलची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी रसिक उत्सुक असतात.

 

ती जे काही करते ते खासच असते.  त्यामुळे सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्गही आहे. मात्र तुमच्या लाडक्या आर्चीचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.  हटके काम करण्यात ती व्यस्त दिसते. रिंकूचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही तिचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. 

मिळालेल्या वेळेत रिंकू शेतात काम करताना दिसते. तसेच चाहत्यांनाही तिने झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला आहे. तिचा हा व्हिडीओ चाहत्यांसाठीही नक्कीच प्रेरणादायी ठरेल हे मात्र नक्की. निसर्गाच्या सानिध्यात राहायला प्रत्येकाला आवडते. त्यामुळेच अकलूजमध्ये रिंकूच्या घराजवळ अनेक प्रकारची झाडं-झुडपंही लावली आहेत. नारळ, आंबा, पेरु आणि वेगवेगळ्या फुलांची भरपूर झाडं आहेत. रिंकूला चित्रकलेचीही आवड आहे. त्यामुळे तिच्या घराच्या भीतींवरही तिने अनेक रेखाटलेले चित्र लावल्याचे पाहायला मिळते. मनमौजी अशी रिंकू आहे. नेहमीच आनंदात आणि हसतमुख राहणारी रिंकूचे आज जगभरात चाहते आहेत.

रिंकू आज खूप लोकप्रिय अभिनेत्री पैकी एक आहे.असे असले तरीही रींकूचे राहणीमान, वागणं यातील साधेपणा कायम आहे. सामान्य आयुष्यच जगणे पसंत करते. तिच्या या व्हिडीओमधून याच गोष्टीची प्रचिती येते. पहिल्याच सिनेमातून मिळालेल्या यशाने हुरुळून न जाता रिंकूचे पाय आजही जमिनीवरच आहेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

 

टॅग्स :रिंकू राजगुरू