Join us  

या चिमुरडीला ओळखलंत का?, पहिल्याच चित्रपटामुळे ही अभिनेत्री रातोरात झाली सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2019 6:30 AM

या फोटोतील छोटी मुलगी आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री

'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरु हिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. इतकंच नाही तर 'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

रिंकू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. 

नुकताच रिंकूने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या आई वडिलांसोबतचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिने शिक्षक दिनानिमित्त केला आहे. या फोटोत रिंकू ओळखता येत नाही आहे. हा फोटो शेअर करून रिंकूने हॅप्पी टीचर्स डे मम्मी पप्पा असं लिहिलं आहे.

काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सैराटमध्ये लक्षवेधी ठरली ती परशा आणि आर्चीची जोडी. सैराटमध्ये आर्ची साकारणारी रिंकू राजगुरू तर भलतीच भाव खाऊन गेली. तिचा प्रत्येक डायलॉग,तिचं ट्रॅक्टर किंवा बुलेट चालवणं, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. त्यामुळेच सैराटमधील आर्ची अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली.

सैराटमुळे तरुणाई जणू काही आर्ची नावाचा जप करू लागली. या सिनेमाने आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचं संपूर्ण आयुष्यच पालटलं. सैराटमध्ये ग्रामीण भागातली तरुणी साकारणाऱ्या रिंकूचा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली. आता तर रिंकूचा चांगलाच मेकओव्हर झाला असून स्टायलिश रिंकू प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 

रिंकू शाळेत असतानाच तिला सैराट हा चित्रपट मिळाला आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. आता तिचा मेकअप हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

टॅग्स :रिंकू राजगुरू