Join us  

अरेच्या ! रिंकू राजगुरुच्या आयुष्यात चिमुकलीच आगमन, व्हिडीओत दिसणारी ही चिमुकली आहे तरी कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 11:42 AM

रिंकू राजगुरुचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. 

अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते.

तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. रिंकूने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रिंकू एका लहान गोंडस मुलीसोबत खेळताना दिसतेय. रिंकूचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. असंख्य लाईक्स आणि कमेंट्स तिच्या या व्हिडीओवर पाहायला मिळत आहे. मात्र रिंकूसोबत व्हिडीओत खेळणार ही लहान चिमुकली कोण हे कळू शकलेले नाही. पण दोघींचा हा व्हिडीओ खूपच लाघवी आहे. 

लवकरच रिंकूमेकअप सिनेमात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर आऊट झाला होता. रिंकूसोबत ट्रेलरमध्ये चिन्मय उद्गीरकरसुद्धा दिसतोय. मात्र तो यात कोणती भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मेकअपचा टीझर पाहून हा सिनेमा खूपच रंजक असल्याची प्रतिक्रिया चाहते देत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश पंडितने केले आहे. 

टॅग्स :रिंकू राजगुरूमेकअप