Join us  

'संगीतकारांसाठी लय आणि राग हेच जीवन', सुरेश वाडकरांनी 'रिदम अँड रागा'च्या निमित्ताने व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 5:45 PM

रिदम अँड रागा या उपक्रमाद्वारे होणाऱ्या हृदयस्पर्शी मुलखातींमध्ये आपल्याला या कलाकारांच्या कधीही न पहिलेल्या आणि न ऐकलेल्या आयुष्याची बाजू अनुभवायला मिळणार आहेत.

न्यू इमर्जिंग वर्ल्ड ऑफ जर्नलिज्म लिमिटेड ( NEWJ ) या कंपनीने  रिदम अँड रागा (Rhythm & Raga) या अनोख्या उपक्रमांतर्गत भारतील वेगवेगळया भागांमधून नावजलेल्या संगीतकारांना, संगीत हे त्यांच्या जीवनात कोणत्या स्थानावर आहे या विषयावर मुलाखती घेतल्या आहेत. भारतीय संगीताच्या प्रादेशिक विशेषतेचा उत्सव आपल्याला या मुलाखती द्वारे पहायला मिळणार आहे. 

रिदम अँड रागा उपक्रमाच्या निमित्ताने पद्मश्री गायक सुरेश वाडकर यांनी सांगितले की ,या उपक्रमाच्या नावातूनच संगीताचा सार प्रतिबिंबित होतो. 'रागा' म्हणजे आनंदाचा स्त्रोत आणि रिदम शिवाय कोणी जगूच शकत नाही. आमच्यासारख्या संगीतकारांसाठी रिदम अँड रागा हेच जीवन आहे. संगीतकारांसाठी, लय आणि राग हे त्यांचे संपूर्ण जग आहे. ह्या मुलाखती मधून संगीताविषयी बोलताना आणि माझे अनुभव सांगताना मला आनंद झाला. ह्या स्तुत्य उपक्रमासाठी माझा विचार केल्याबद्दल मी न्यूजचे आभार मानतो.

महाराष्ट्र, आसाम, कर्नाटका, पंजाब, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा अशा ८ राज्यांमधून कलाकार सहभागी झाले आहेत. रिदम अँड रागा या उपक्रमाद्वारे होणाऱ्या हृदयस्पर्शी  मुलखातींमध्ये आपल्याला या कलाकारांच्या कधीही न पहिलेल्या आणि न ऐकलेल्या आयुष्याची बाजू अनुभवायला  मिळेल.

ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर, कर्नाटकी  गायिका पद्मश्री सुधा रघुनाथन, प्रसिद्ध रॉक सिंगर रघु दीक्षित, त्याच बरोबर आज लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले संगीतकार यशराज मुख़ाते, नंदी सिस्टर्स अंकिता आणि अंतरा, गायिका असीस कौर आणि गायिका अंतरा चक्रबर्ती अशी नावाजलेली सर्व कलाकार मंडळी आहेत. संगीत भाषा आणि राज्यांपलीकडे जाऊन प्रेक्षकांना कसे आवडते, एवढच नव्हे  तर संगीताचे त्यांच्या आयुष्यातील स्थान आणि मुख्य म्हणजे प्रत्येकाच्या वेगळ्या संगीत शैलीबद्दल ते मुलाखती मध्ये सांगणार आहेत.

 

टॅग्स :सुरेश वाडकर