Join us  

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ऋताने दिला मौल्यवान सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2018 9:42 AM

७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. आपण सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी आणि ...

७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. आपण सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी आणि आपले आरोग्य निरोगी असणे आवश्यक आहे. या दिवशी प्रत्येकजण आपापल्या परीने आरोग्याशी निगडीत आपले विचार मांडतो आणि जमेल तशी मदत करत असतो. ही मदत कोणत्याही स्वरुपाची असू शकते. जसे की एखादा सल्ला किंवा काळजी देखील मदत असू शकते. अशीच मदत अभिनेत्री ऋता दुर्गुळेने केली आहे.जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ऋताने प्रेक्षकांपर्यंत एक संदेश पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे ज्यामध्ये तिने प्रेक्षकांकडून स्वत:च स्वत: ची काळजी घेण्याचे वचन मागितले आहे. सध्या उन्हाळा खूप आहे आणि या वाढत्या गरमीमुळे अनेकांना त्रास होत आहे. तर या गरमीच्या वातावरणात जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला ऋताने दिला आहे. उन्हाळ्यामुळे डिहायड्रेशन होते ज्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. पाणी पिण्याचे प्रमाण वाढवून या उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या असा मौल्यवान सल्ला ऋताने दिला आहे.ऋताने नुकतेच सोशल मीडियावर एक कॅम्पेनसुद्धा सुरु केले आहे. वेळात वेळ काढून तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया माध्यमावर #GetToKnowHruta  ही कॅम्पेन सुरू केले होते. ज्यामध्ये तिने चाहत्यांना तिचे आवडते कलाकार, पदार्थ, चित्रपट, गाणी, छंद ओळखायला सांगितले होते. फॅन्सनी योग्य अंदाज बांधल्यावर ऋताने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. अशाप्रकारे #GetToKnowHruta कॅम्पेनमुळे फॅन्सना त्यांची लाडकी अभिनेत्री ऋताविषयी नवीन जाणून घ्यायला मिळाले. ऋता दुर्गुळे ही मुळची मुंबईची असून तिचे शिक्षण रुईया कॉलेजमधून झाले आहे. तिच्या घरातील कोणीच अभिनयक्षेत्रात नसल्यामुळे या क्षेत्रात प्रवेश करणे तिच्यासाठी कठीण होते. पण तरीही तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर छोट्या पडद्यावर एंट्री मारली. तिच्या दुर्वा या पहिल्याच मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.