Join us  

रेशम टिपणीस म्हणतेय थंडा थंडा कुल कुल, कसौलीतील गारेगार वातावरणाचा घेतेय आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 8:00 AM

एक बिनधास्त जीवन जगणारी अशी रेशमची ओळख आहे. आपल्या रिलेशनशिपबाबतही रेशम तितकीच बिनधास्त आहे. 

'मराठी बिग बॉस' या रियालिटी शोनंतर रेशम टिपणीस हे नाव मराठी रसिकांच्या चर्चेचा विषय बनलं. हिंदी आणि मराठी सिनेमा तसंच मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी रेशम मध्यंतरीच्या काळात तितकी चर्चेत नव्हती. मात्र बिग बॉस हा मराठी रियालिटी शोमधील एंट्रीने रेशम पुन्हा रसिकांच्या मनात घर करुन गेली. त्यामुळेच की काय तिच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टी जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. मराठी बिग बॉसचा सीझन संपल्यानंतर रेशम लगेचच वस्त्रहरण या नाटकाशी जोडली गेली आहे. या नाटकात ती एक लक्षवेधी भूमिका साकारत आहे. एक बिनधास्त जीवन जगणारी अशी रेशमची ओळख आहे. आपल्या रिलेशनशिपबाबतही रेशम तितकीच बिनधास्त आहे. 

संदेश किर्तीकरसह असलेल्या रिलेशनशिपची तिने उघडपणे कबुलीही दिली आहे. नुकतंच हे लव्हबर्ड्स हिमाचल प्रदेशमधील कसौली इथं एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळालं. सध्या सारेच थंडीने कुडकुडत असताना रेशम आणि संदेश कसौलीच्या गारेगार वातावरणात रोमँटिक सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. रेशमने सोशल मीडियावर आपले कसौलीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘कसौली ८ अंश सेल्सिअस’ या कॅप्शनसह रेशमने हे फोटो शेअर केले आहेत. रेशमचे हे फोटो पाहून तुम्हालाही थंड वातावरणात सुट्ट्यांचा आनंद घ्यावा असं वाटत असेल.

संदेेश हा खासगी आयुष्यातील सर्वात स्पेशल व्यक्ती असल्याचे रेशमने बिग बॉस शोमध्ये सांगितलं होतं. रेशम ही संदेशपेक्षा वयाने ४ वर्षांनी मोठी आहे. रेशम ४२ वर्षांची तर संदेश ३८ वर्षांचा आहे. या दोघांचे अनेक फोटो रेशमच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पाहायला मिळतात. 

रेशमच्या इन्सटाग्राम अकाउंटवर नजर टाकली असता आपल्याला कळून येईल की रेशम तिच्या फिटनेसबाबत जागरुक आहे आणि त्यामुळेच की काय रेशमचे सौंदर्य आजही अबाधित आहे. तिच्या फोटोंकडे पाहिले असता तिच्या वयाचा अंदाज बांधणं कुणालाही शक्य नाही. फिट राहावं आणि सौंदर्य टिकून राहावं यासाठी रेशम बरीच मेहनत घेते. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत ती स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळालं. या फोटोला तिने कॅप्शनही दिली होती. स्वतःला वॉटर बेबी म्हणत नेहमीच पोहायला आवडतं असं तिने या कॅप्शनमधून सांगितलं होतं.  

टॅग्स :रेशम टिपणीस