रमेश परदेशीनं दिले अनोखं रिटर्न गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 14:49 IST
मुुळशी डॉट कॉम व फर्स्ट मे या आगामी मराठी चित्रपटात अभिनय करण्यासाठी सज्ज असणारे रमेश परदेशी या कलाकाराने आपल्या ...
रमेश परदेशीनं दिले अनोखं रिटर्न गिफ्ट
मुुळशी डॉट कॉम व फर्स्ट मे या आगामी मराठी चित्रपटात अभिनय करण्यासाठी सज्ज असणारे रमेश परदेशी या कलाकाराने आपल्या वाढदिवस दिवशी एक अनोखं रिटर्न गिफ्ट निसर्गाला दिले आहे. त्याने आपल्या परिसरातील वेताळ टेकडीवर जांभूळ, वड, पिंपळ सारखी चाळिस झाडे लावली आहेत. त्याच्या ह्या उपक्रमात प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, देवेंद्र गायकवाड, सुनील अभ्यंकर, ऋषिकेश देशपांडे, सिद्धी कुलकर्णी, विनोद वनवे, अमोल धावडे, गौरव भेलके, सुरेश विश्वकर्मा आदी कलाकार उपस्थित होते. रमेशने अनेक मालिका करता असताना रेगे आणि देऊळबंद यांसारखे चित्रपट देखील त्याने केले आहेत. तसेच अजय देवगण बरोबर 'दृश्यम' हया हिंदी चित्रपटात देखील तो झळकला होता. कलाकाराचे हे रिटर्न गिफ्ट नक्कीच समाजाला आदर्श घालू पाहत आहे.