Join us

राकेशला चढली भांगची झिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2016 10:04 IST

         जय जय शिव शंकर.. काटा लागे न कंकर या गाण्यातील राजेश खन्ना अन मुमताज यांनी ...

         जय जय शिव शंकर.. काटा लागे न कंकर या गाण्यातील राजेश खन्ना अन मुमताज यांनी भांग पिऊन त्या गाण्यात केलेली मस्ती पहायला खरच खुप मजा येते. होळी आली कि हे गाण हमखास वाजणारच. आता अशीच भांगाची झिंग चढली आहे आपला क्युट हॅन्डसम हंक राकेश बापट याला. एवढेच नाही तर राकेशला मस्तपेैकी भांग बनवताही येते म्हणे हे आम्ही नाही तर त्याची कोस्टार पुजा सावंतच सांगत आहे. सीएनएक्स सोबत वृंदावन टिमच्या होळी पाटीर्ची धमाल पुजाने शेअर केली अन राकेशचे गुपित सुद्धा उघड केले. ती म्हणते, राकेश खरच एक चांगला आर्टीस्ट आहे. त्याला एकदम छान भांग बनवता येतो. आम्ही होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी वृंदावन टिमने एका पार्टीचे आयोजन केले होते त्यामध्ये राकेशने स्वत: भांग बनविली आणि आम्ही सर्वांनी ती पिली. आता या भांगाची झिंग या राकेशवर किती चढली हे मात्र गुलदस्त्यातच राहिले आहे. पण राकेशच्या भांग बनविण्याच्या या हुनरसाठी थ्री चिअरर्स तो बनता है.