Join us  

मी त्याचा फोन का घेतला नाही? मामाच्या निधनानंतर पुष्कर जोगचा भावुक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 8:16 PM

Pushkar Jog Video : कृपा करून रूसवे-फुगवे, हेवेदावे सर्व काही बाजूला ठेवून जीवाभावाच्या माणसांना जपा. त्यांच्याशी बोला, अशी कळकळीची विनंती पुष्करने हा व्हिडीओ शेअर करताना केली आहे.

ठळक मुद्देया फोटोच्या कॅप्शनमध्येही मामाचा कॉल का घेतला नाही? याबद्दलची खंत त्याने व्यक्त केली आहे.

डोळ्यांनाही न दिसणा-या कोरोना नावाच्या एका सूक्ष्म व्हायरसने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केलेत. अनेकांच्या जीवाभावाच्या लोकांना हिरावून घेतले. मराळमोळा अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog ) यानेही कोरोनामुळे आपल्या प्रिय मामाला गमावले. कोरोनामुळे त्यांचे नुकतेच निधन झाले. मामाच्या निधनानंतर पुष्करने एक भावुक व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी पुष्करला अश्रू आवरता आले नाहीत. त्याचा कॉल मी का नाही उचलला? असं म्हणताना त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले. कृपा करून रूसवे-फुगवे दूर ठेवा, हेवेदावे, वैचारिक मतभेद सर्व काही बाजूला ठेवून जीवाभावाच्या माणसांना जपा. त्यांच्याशी बोला, अशी कळकळीची विनंती त्याने हा व्हिडीओ शेअर करताना केली. (Pushkar Jog Video)

व्हिडीओत काय म्हणाला पुष्कर...पाडव्याच्या दिवशी माझा मामा माझ्याशी बोलला होता. 21 एप्रिलला सकाळी 8 वाजता त्याचा मला परत फोन आला. मला लवकरच उठायची सवय नाही. त्यामुळे मी त्याचा फोन उचलू शकलो नाही. कॉल बॅक करणेही जमले नाही. दुस-याच दिवशी माझा गोव्याचा सतीश मामा गेल्याचे मला कळले. खूप वाईट वाटले. मी त्याचा फोन का नाही उचलला? आपण अनेकदा नातेवाईकांचा फोन घेणे टाळतो, कधी तो चुकतो. पण आता असे नका करू. त्यांच्याशी बोला. त्यांना विचारा. हल्ली कोरोनामुळे आपली माणसं आपल्याला सोडून चालली आहेत. तेव्हा मिस्ड कॉल होऊ देऊ नका. सगळ्यांशी चांगलं वागा, प्रेमाने बोला..., असे म्हणताना पुष्करला भरून आले.या फोटोच्या कॅप्शनमध्येही मामाचा कॉल का घेतला नाही? याबद्दलची खंत त्याने व्यक्त केली आहे. त्यावेळेस त्याचा मिस्ड कॉल माझे मन अजूनही खात आहे. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, कृपा करून एकमेकांच्या संपर्कात राहा़ लॉकडाऊन असल्यामुळे सर्वांशी संपर्क होत नाहीये. हे योग्य नाही. काळ कठीण आहे. तेव्हा सगळे हेवेदावे, रूसवे फुगवे विसून आपल्या जीवाभावाच्या लोकांच्या संपर्कात राहा. कॉल मॅसेज तर कधीच मिस करू नका, असे त्याने लिहिले आहे.

टॅग्स :पुष्कर जोग