Join us  

अमोल कोल्हे करणार नाटकाची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2016 6:51 AM

सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये नाटकाची चलती दिसत आहे. तसेच एकापोठपाठ एक स्टार कलाकार रंगभूमीवर कोणत्या कोणत्या भूमिकेत रंगताना दिसत आहे. ...

सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये नाटकाची चलती दिसत आहे. तसेच एकापोठपाठ एक स्टार कलाकार रंगभूमीवर कोणत्या कोणत्या भूमिकेत रंगताना दिसत आहे. आता, आपली सर्वाचा लाडका कलाकार अमोल कोल्हे देखील बंध-मुक्त या नाटकाची निर्मिती करताना दिसणार आहे.तिरकिटधा प्रस्तुत आणि जगदंब क्रिएशन्सची निर्मित बंध-मुक्त हे नवंकोरं नाटक लवकरच रंगमंचावर येणार आहे. विवेक आपटे लिखित बंध-मुक्त या नाटकाचं दिग्दर्शन डॉ. अनिल बांदिवडेकर यांनी केले आहे.  या नाटकात पार्श्वसंगीत राहुल रानडेंनी दिले आहे तर नेपथ्यची जबाबदारी राजन भिसे आणि प्रकाशयोजनेची जबाबदारी शीतल तळपदे यांनी पेलली आहे. विलास सावंत, सोनाली राव, डॉ. अमोल कोल्हे यांनी बंध-मुक्त या नाटकाची निर्मिती केली आहे आणि डॉ. अजित देवल यांनी सहनिमीर्ती केली आहे. बंध-मुक्त या नाटकाच्या नावावरुनच विषय नेहमीपेक्षा वेगळा असल्याची कल्पना येत आहे.