Join us  

म्हणून प्रियदर्शन जाधव झाला सोशल मीडियावर ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 4:44 PM

अभिनेता प्रियदर्शन जाधवला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. त्याला ही कारण तसेच आहे की, प्रियदर्शनने पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत नाराजी व्यक्त करणार ट्विट केलं आहे.

ठळक मुद्देप्रियदर्शन सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतो

अभिनेता प्रियदर्शन जाधवला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. त्याला ही कारण तसेच आहे की, प्रियदर्शनने पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत नाराजी व्यक्त करणार ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये प्रियदर्शनने लिहिले आहे,  “राजीव गांधी ह्यांच्या विधानाने तर पूर्णपणे तुम्ही पूर्णपणे मनातून उतरलात मोदीजी! सामान्य माणसाला काहीच कळत नाही, अशा भ्रमात राहू नका. ही तीच माणसं आहेत ज्यांनी तुम्हाला सत्ता दिली आणि काँग्रेसला घरी बसवलं,” असं त्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे. प्रियदर्शनच्या या ट्विटनंतर त्याला चांगलाच ट्रोल करण्यात आले आहे. 

प्रियदर्शन सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध विषयांवर नेहमीच भाष्य करत असतो. त्यामुळे अनेक वेळा त्याला ट्रोल ही केले जाते.  मस्का सिनेमाच्या माध्यमातून त्यांने दिग्दर्शनातदेखील पदार्पण केले आहे.  मोरुची मावशी, मिस्टर अँड मिसेस, जागो मोहन प्यारे यांसारख्या नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. प्रियदर्शनने विजय असो, चिंटू २ यांसारख्या चित्रपटांत काम केले आहे. पण टाईमपास २ या चित्रपटामुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात त्याने साकारलेली दगडूची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. काही महिन्यांपूर्वी स्वप्निल जोशीसोबत तो मी पण सचिन सिनेमात दिसला होता.

टॅग्स :प्रियदर्शन जाधव