Join us  

स्वानंदी बेर्डे आणि तिच्या मित्राच्या फोटोबाबत प्रिया बेर्डे यांनी केला हा खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2021 4:08 PM

स्वानंदी बेर्डेच्या सोशल मीडियावरील एका फोटोची नुकतीच चांगलीच चर्चा झाली होती. या फोटोसोबतच्या एका कॅप्शनमुळे एक वेगळीच चर्चा रंगली होती.

ठळक मुद्देप्रिया बेर्डे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, या सगळ्यामुळे आमच्या कुटुंबियांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. प्रेम मोदी हा स्वानंदीचा केवळ खूप चांगला मित्र आहे

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डेच्या सोशल मीडियावरील एका फोटोची नुकतीच चांगलीच चर्चा झाली होती. या फोटोसोबतच्या एका कॅप्शनमुळे एक वेगळीच चर्चा रंगली होती. या पोस्टमुळे स्वानंदीला तिच्या स्वप्नातील राजकुमार मिळाला अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये छापून आल्या होत्या. पण आता या सगळ्यावर स्वानंदीची आई प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

प्रिया बेर्डे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, या सगळ्यामुळे आमच्या कुटुंबियांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. प्रेम मोदी हा स्वानंदीचा केवळ खूप चांगला मित्र आहे. त्याच्या कुटुंबियांचे देखील आमच्या कुटुंबासोबत खूप चांगले संबंध आहेत. प्रेमचा वाढदिवस असल्याने तिने आपल्या मित्रासाठी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. पण त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला.

स्वानंदीने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर एका मुलासोबतचा फोटो शेअर केला होता. प्रेम मोदी असे या फोटोतील तरुणाचे नाव होते. या फोटोसोबत तिने लिहिलेल्या कॅप्शनची चांगलीच चर्चा रंगली होती. ‘तुझ्य चेहऱ्यावरचे हास्य पाहण्यासाठी मी काहीही करु शकते. आयुष्यातील कठीण काळात आपण अधिक जवळ आलो आहोत. आता तुझी इतकी सवय झाली आहे की मला एकटीला भिती वाटते आहे. खुप प्रेम...,’ 

स्वानंदीचा प्रेम केवळ चांगला मित्र असल्याने तिने त्याच्यासाठी ही खूप चांगली पोस्ट लिहिली होती. पण या पोस्टमुळे त्यांच्यात मैत्रीशिवाय आणखी काही आहे का या चर्चेला उधाण मिळाले होते.

आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत स्वानंदी सुद्धा अभिनयाच्या दुनियेत येण्यासाठी सज्ज आहे. ‘रिस्पेक्ट’ या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे.  

टॅग्स :स्वानंदी बेर्डेप्रिया बेर्डेलक्ष्मीकांत बेर्डे