Join us

प्रिया बापटचा पहिला कॅम्पिंग अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2017 12:03 IST

प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी कॅम्पिंगचा अनुभव घ्यावा असे वाटते. तो तंबू, त्या तंबूभोवती घडणारी धमाल त्याचबरोबर तो रंगलेला अंताक्षरीचा डाव या हे सर्व क्षण आपण ही अनुभवावे असे प्रत्येकाला वाटत असते. पण हा कॅम्पिंगचा आनंदाचा क्षण सध्या अभिनेत्री प्रिया बापटच्या आयुष्यात आलेला दिसत आहे.

प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी कॅम्पिंगचा अनुभव घ्यावा असे वाटते. तो तंबू, त्या तंबूभोवती घडणारी धमाल त्याचबरोबर तो रंगलेला अंताक्षरीचा डाव या हे सर्व क्षण आपण ही अनुभवावे असे प्रत्येकाला वाटत असते. पण हा कॅम्पिंगचा आनंदाचा क्षण सध्या अभिनेत्री प्रिया बापटच्या आयुष्यात आलेला दिसत आहे. कारण प्रियाने नुकतेच सोशलमीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. ती आपल्या या व्हिडीओच्या माध्ममातून सांगते, हा माझा पहिला कॅम्पिंग अनुभव आहे. आम्ही डाउकी नावाच्या गावातील एका नदीकिनारी आहोत. येथे आम्ही तंबूदेखील ठोकला आहे. रात्री येथेच राहणार आहोत. हा कॅम्पिंग एन्जॉय करण्यासाठी मी खूप उत्साही असल्याचे तिने सांगितले. तिचा हा व्हिडीओ पाहून ती खूपच आनंदी आणि उत्साही असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच सोशलमीडियावर प्रियाच्या या व्हिडीओला भरभरून पसंती मिळाली असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर तिच्या चाहत्यांनी तिला सुपर अनुभव म्हणत मकर संक्रांतीच्या भरभरून शुभेच्छा आपल्या कमेंन्टच्याद्वारे दिल्या आहेत. प्रिया  हा कॅम्पिंग नक्की एक ट्रीप म्हणून एन्जॉय करते का, तिच्या आगामी चित्रपटाची ही तयारी आहे हे मात्र कळाले नाही. प्रेक्षकांची लाडकी चुलूबूली अभिनेत्री प्रि़या बापटचा काही दिवसांपूर्वीच वजनदार हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटासाठी प्रियाने आपले वजनदेखील वाढविले होते. त्यावेळी तिचे या मेहनतीसाठी विशेष कौतुकदेखील करण्यात आले होते. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेत्री सई ताम्हणकरदेखील पाहायला मिळाली होती. सचिन कुंडलकर दिग्दर्शित या चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.