Join us  

प्रिया बापटने शेअर केला पती उमेश कामतसोबतचा फोटो, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 7:17 PM

प्रिया सोशल मीडियावरही बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे

कोरोनामुळे देशात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे सगळेच सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात आहेत.  अभिनेत्री प्रिया बापटदेखील तिचे वार्कआऊट करतानाचे, स्वयपांक करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतेस प्रियाने पती उमेश कामतसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला प्रियाने एक कॅप्शन देखील दिले आहे. प्रिया म्हणते, माझं नशीब लॉकडाऊनमध्ये तू माझ्यासोबत आहे. प्रिया आणि उमेशच्या फॅन्सनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.

नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावरही बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय नेहमी ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते. 

टॅग्स :प्रिया बापटउमेश कामत