Join us  

मेकअपशिवाय ही प्रिया बापट दिसते तितकीच सुंदर, फोटो झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 11:30 AM

सोशल मीडियावर प्रिया बापट बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. प्रियाने ...

सोशल मीडियावर प्रिया बापट बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. प्रियाने इन्स्टाग्रामवर तिचा  फोटो शेअर केला आहे.  या फोटोत प्रिया विना मेकअप लूकमध्ये ही तितकीच सुंदर दिसतेय. प्रियाचा हा विनामेकअप लूकमधील फोटो फॅन्सना आवडला आहे. 

करिअरची सुरुवात केल्यापासून प्रियाने आतापर्यंत तिच्या यशाचा आलेख कायम उंच ठेवला आहे. त्यामुळे तिला आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक समजले जाते. लवकरच ती एका इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. आदित्य कृपलानीच्या या कलाकृतीचे नाव फादर लाइक असे आहे. सिंगापूरमध्ये याचे चित्रीकरण सुरू होणार आहे. पहिल्याच इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी प्रिया उत्सुक आहे. याशिवाय 'प्रिया सिटी ऑफ ड्रीम्स'च्या दुसऱ्या सीझनमध्ये देखील झळकणार आहे.

'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे. हिंदी चित्रपटानंतर प्रिया आता हिंदी वेबसिरीजमध्ये दिसली होती. 

टॅग्स :प्रिया बापट