Join us  

प्रिया बापट आणि उमेश कामतने रोमँटिक मूडमधील फोटो केले शेअर, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 3:50 PM

प्रिया बापट आणि उमेश कामतच्या रोमँटिक अंदाजातील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट हे एक क्युट कपल म्हणून ओळखले जातात. दोघे ही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. अलीकडेच प्रियाने पती उमेश कामतसोबतचा एक क्युट फोटो शेअर केला आहे. प्रिया आणि उमेशच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

प्रिया बापटने उमेश कामतसोबतचा रोमँटिक अंदाजातील फोटो शेअर करत लिहिले की, जेव्हा तू घट्ट मिठीत घेतोस तेव्हा सर्वकाही योग्य असल्याचे वाटते.प्रियाच्या या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तसेच उमेशनेदेखील त्या दोघांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  

सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ते लग्नबेडीत अडकले होते. प्रिया बापट आणि उमेश कामत हे एकाच इंडस्ट्रीत असल्याने एकमेकांना खूप अगोदरपासून चांगले मित्र होते. कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले पण एकमेकांसाठी असलेले प्रेम व्यक्त कोण करणार अशी अडचण होती. अखेर प्रियाने पुढाकार घेत प्रेम व्यक्त केले आणि उमेशने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या प्रेमाला होकार दिला.

उमेश आणि प्रिया यांच्या वयात ८ वर्षाचे अंतर आहे. या कारणामुळे उमेश लग्नाबाबत साशंक होता. यासाठी त्याने सहा वर्षाचा वेळ घेतला आणि अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला. याची आठवण करत प्रियाने एका मुलाखतीत सांगितले होते की, उमेशने लग्नासाठी फार वेळ घेतला. आमच्या रिलेशनशीपमध्ये मी पुढाकार घेतला होता आणि त्याच्याशी लग्न करण्यासाठी मी इतकी आतूर झाले होते की मी स्वतःला लंपट समजायला लागले होते.

अखेर उमेशने लग्नाचा निर्णय घेत ऑक्टोबर २०११ साली लग्न केले. ते दोघे सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. त्यांच्या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात.

टॅग्स :प्रिया बापटउमेश कामत