Join us  

प्रिया बापट आणि उमेश कामतच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण, लग्नातील उखाण्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 1:30 PM

उमेश आणि प्रियाच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील उमेश कामत आणि प्रिया बापट ही जोडी लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. उमेश आणि प्रिया दोघेही सोशल मीडियावर एक्टिव्ह आहेत आणि ते सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. आज उमेश आणि प्रियाच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने प्रियाने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नातील उखाण्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

प्रिया बापटने इंस्टाग्रामवर त्यांच्या लग्नातील उखाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि लिहिले की,'माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट दिवस, माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय, आमच्या लग्नातील सर्वांत चांगला क्षण. श्री कामत १० वर्षे पूर्ण झाली.' या व्हिडीओत प्रिया आणि उमेश दोघेही उखाणा घेताना दिसत आहे. सुरुवातीला उमेश उखाणा घेताना दिसतो आहे, तो म्हणाला की, “कांती जिची सुरेख, रुप जिचे अलवार.. प्रिया माझी रत्नजडीत तलवार”. उमेशचा हा उखाणा ऐकल्यानंतर लग्नात उपस्थित असलेले सगळ्या पाहूण्यांना हसू अनावर होते. त्यानंतर पुढे प्रिया बापट उमेश कामतसाठी उखाणा घेतला. ती म्हणाली की, “सारेगमपच्या सुरांचा लागलाय नवा साज.. उमेश माझा जुनाच गडी पण नवं माझं राज्य.” 

उमेश आणि प्रिया यांच्या वयात ८ वर्षाचे अंतर आहे. या कारणामुळे उमेश लग्नाबाबत साशंक होता. यासाठी त्याने सहा वर्षांचा वेळ घेतला आणि अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला.

अखेर उमेशने लग्नाचा निर्णय घेत ऑक्टोबर २०११ साली लग्न केले.

टॅग्स :प्रिया बापटउमेश कामत