गायिका सावनी रविंद्रचं भावी पतीसह प्री-वेडिंग फोटोशूट, दिसला रोमँटिक अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 16:33 IST
सध्या लग्नाचा मोसम सुरु आहे. सगळीकडे लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीसुद्धा याला अपवाद नाहीत. गेल्या काही महिन्यांत अनेक ...
गायिका सावनी रविंद्रचं भावी पतीसह प्री-वेडिंग फोटोशूट, दिसला रोमँटिक अंदाज
सध्या लग्नाचा मोसम सुरु आहे. सगळीकडे लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीसुद्धा याला अपवाद नाहीत. गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी सेलिब्रिटींचं शुभमंगल पार पडलं आहे. प्रार्थना बेहरे, सानिका अभ्यंकर, रोहन गुजर, सागरिका घाटगे, अमेय वाघ, शशांक केतकर, आरोह वेलणकर अशी सिनेसृष्टीतील विविध कलाकार मंडळी रेशीमगाठीत अडकले आहेत. येत्या काही दिवसांत आणखी काही सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकणार आहेत. यांत गायिका सावनी रविंद्र हिचा उल्लेख करावा लागेल. नुकताच सावनीचा साखरपुडा पार पडला आहे. आपल्या जीवनातील या खास क्षणाला संस्मरणीय करायचे सावनी आणि तिच्या पतीने ठरवले आहे. सध्या लग्नाआधी प्री-वेडिंग फोटोशूटचा ट्रेंड पाहायला मिळतो आहे. आपल्या जोडीदारासह काही खास क्षण कॅमे-यात कैद करुन प्री-वेडिंग फोटो शूट केलं जाते. सावनी आणि तिच्या पतीनेेसुद्धा आपल्या लग्नाआधी रोमँटिक प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे.या फोटोशूटचे फोटो सावनीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लग्नाआधी सावनीने तिच्या चाहत्यांसाठी हे खास सरप्राइज दिले आहे. यात सावनी आणि तिच्या पतीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दोघांचे फोटो खास असल्याचे पाहायला मिळत आहे. दोघांचा हा रोमँटिक अंदाज घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल.सावनीने हे फोटो इन्स्टाग्रामवर आपले मित्र-मैत्रिणी तसंच फॅन्ससह शेअर केले आहेत. या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरु झाला आहे. सावनी रविंद्रच्या पतीचे नाव डॉ. आशिष धांडे असे आहे.या दोघांचा साखरपुडा 19 मार्च रोजी झाला होता. साखरपुडा झाला असला तरी सनई चौघडे कधी वाजणार अर्थात त्यांच्या लग्नाची तारीख काय हे अद्याप समोर आलेले नाही.सावनी रवींद्रचा गुढीपाडव्याच्या संध्याकाळी सावनीने ठरावीक मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत साखरपुडा केला.कात्रजमधील एका सभागृहात हा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याला मराठी इंडस्ट्रीतील सावनीच्या जवळचे मित्रमैत्रीण उपस्थित होते.आशिष डांगे पेशाने डॉक्टर आहे.आशिष हा मुळचा पुण्याचा असून त्याचे सगळे शिक्षण देखील पुण्यात झाले आहे.आशिष डांगेने त्याच्या होणाऱ्या पत्नीसाठी म्हणजेच सावनीसाठी साखरपुड्याला एक छानसे गाणे देखील गायले.साखरपुड्याला सावनीने हिरव्या रंगाची साडी नेसली होती. या गेटअपमध्ये ती खूपच छान दिसत होती. या तिच्या फोटोंवर तिच्या फॅन्सनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या होत्या.