Join us  

प्रवीण तरडेने गमावला जवळचा मित्र, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 6:11 PM

प्रवीण तरडेने त्याचा एक जवळचा मित्र नुकताच गमवला असून त्याच्यासाठी खास भावूक पोस्ट लिहिली आहे.

ठळक मुद्देप्रवीणने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, नियतीचा पुन्हा क्रुर घाला ... स्त्यावरील अपघातात लेखक मित्र स्वप्निल कोलते पाटील गेला .. मित्रा स्वप्निल परवा तुला तुझ्या अप्रतिम लेखनासाठी व्हिडिओ बाईट दिला..

दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. तो त्याचे फोटो, त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. त्याने सोशल मीडियावर नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याने त्याचा एक जवळचा मित्र नुकताच गमवला असून त्याच्यासाठी खास भावूक पोस्ट लिहिली आहे.

प्रवीणने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, नियतीचा पुन्हा क्रुर घाला ... स्त्यावरील अपघातात लेखक मित्र स्वप्निल कोलते पाटील गेला .. मित्रा स्वप्निल परवा तुला तुझ्या अप्रतिम लेखनासाठी व्हिडिओ बाईट दिला...  मुक्कदर वाचून तुझं कौतुक उभ्या महाराष्ट्राला अजून करायचं होतं रे ...  तू सध्या शंभुराजांवर शेरे दख्खन लिहित होतास... इतिहासावर दोन्ही छत्रपतींवर भरभरून बोलणारा, लिहणारा तरुण लेखक गेला... मित्रा भावपूर्ण श्रद्धांजली...

नियतीचा पुन्हा क्रुर घाला ... स्त्यावरील अपघातात लेखक मित्र स्वप्निल कोलते पाटील गेला .. मित्रा स्वप्निल परवा तुला...

Posted by Pravin Vitthal Tarde on Wednesday, January 27, 2021

स्वप्निल कोलते पाटील हे लेखक असून केवळ ३३ वर्षांचे होते. पुणे-सोलापूर हायवेवरील उराली कांचन या भागात त्यांचा अपघात झाला. लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इनामदार वस्ती जवळ रात्री साडे अकरा वाजता हा अपघात झाला. स्वप्निल यांच्या घरापासून हे ठिकाण दोन किमीवर आहे. एका अज्ञात वाहनाने स्वप्निल यांच्या स्कूटरला धक्का देऊन वाहनचालक वाहन घेऊन पसार झाला. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या शरीरावर अनेक फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे त्यांना वाचवणे शक्य झाले नाही. स्वप्निल हे लेखक असण्यासोबत त्यांचा मोबाईलचा व्यवसाय होता. कामानिमित्त ते बाहेर गेले होते. परतत असताना त्यांच्या स्कूटरला हा अपघात झाला.  

स्वप्निल यांनी मुक्कदर कथा औरंगजेबाची हे पुस्तक नुकतेच लिहिले होते. त्यांच्या पश्चात आई, बहीण, लहान मुलगा आणि मुलगी आहे. 

टॅग्स :प्रवीण तरडे