Join us

प्राजक्ता का रमतेय नव्वदीच्या काळात ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 14:34 IST

          अभिनेत्री प्राजक्ता माळी मालिका आणि रंगमंचावरील तिच्या चतुरस्त्र अभिनयामुळे आज घराघरात ओळखली जाते. आता ...

          अभिनेत्री प्राजक्ता माळी मालिका आणि रंगमंचावरील तिच्या चतुरस्त्र अभिनयामुळे आज घराघरात ओळखली जाते. आता ती लवकरच मोठ्या पडदयावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्राजक्ता आणि सुव्रत जोशीची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ऐंशी-नव्वदचा काळ प्रेक्षकांना या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. पास्ट आणि प्रेझेंटमध्ये गुंफण्यात आलेली ही कथा फारच अफलातून आणि भारी असल्याचे प्राजक्ताचे म्हणणे आहे. या चित्रपटातील भूमिके संदर्भात प्राजक्ताने लोकमत सीएनएक्सशी संवाद साधताना अनेक पैलु उलगडले. प्राजक्ता सांगते, मला नव्वदच्या काळातील शूटिंग करायची असल्याने सुरुवातीला फारच मजा आली. तो काळ उभा करण्यासाठी आम्ही फार मेहनत घेतली. प्रामुख्याने आम्हाला आमच्या लूक्सवर काम करावे लागले. हम आपके है कौन आणि डिडिएलजेचा तो काळ आम्हाला उभा करायचा होता. ही गोष्ट चार मित्रांची आहे. यात माझी भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचे प्राजक्ता सांगते. वयाने लहान दिसण्यासाठी सुव्रत आणि अक्षय या दोघांनीही या भूमिकांसाठी त्यांचे वजन कमी केले आहे. एवढेच नाही तर त्यांनी दाढी-मिशा देखील काढल्या आहेत. चित्रपटासाठी जमलेली यांची जोडी प्रेक्षकांना भावतेय का हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. प्राजक्ता अल्पावधीत मालिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करु शकली. त्यानंतर तिला काही चित्रपटांच्या ऑफर्स देखील येऊ लागल्या. आता या चित्रपटासाठी या सर्वच कलाकारांनी घेतलेली मेहनत किती कामी येतेय हे तर आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल.